राष्ट्रवादी पक्षाचे अमरावती जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष मंगेश काळमेघ यांच्यातर्फे अंशुक ढोक यांचा सत्कार!

Maharashtra police


 महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी अंशुक ढोक यांची निवड 


 प्रतिनिधी /पवन पाटणकर शिराळा 

 शिराळा येथील राष्ट्रवादी पक्षाचे अमरावती जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष तथा लाडकी बहीण योजना कमिटीचे शासकीय सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळमेघ यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी शिराळा येथील युवा अंशुक अतुल ढोक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 अंशुक ढोक हे दोन वर्षापासून पोलीस बॉईज संघटनेची जुळलेले आहे. त्यांची कार्य तत्परता व संघटनेतील सर्वांशी समन्वय  व त्यांची कार्यप्रणाली बघता सर्वानुमते त्यांची अमरावती जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गृहमंत्रालयाशी संबंधित असून राहुलभैय्या दुबाले हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संघटनेमध्ये बहुतांश प्रमाणात पोलीस पाल्य सुद्धा जुळलेले असून पोलिसांच्या न्याय व हक्काकरिता लढणारी व त्यांची बाजू घेऊन चालणारी व पोलिसांना मदत करणारी संघटना म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ओळखली जाते.

 अशातच शिराळा येथील युवा तडफदार अंशुक ढोक हे या संघटनेत सक्रिय झाले. व त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये या संघटनेचा विस्तार केला. त्यांची ही कार्यप्रणाली लक्षात घेता त्यांची अमरावती जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेमध्ये निवडून येण्याकरता 106 मतांची आवश्यकता होती.  परंतु अंशुक ढोक यांचा वाढता संपर्क व स्पष्टवक्तेपणा, व त्यांच्यातील नेतृत्वगुण, व सर्व अधिकारी कर्मचारी व सदस्यांची जुळवून घेणे या बाबींचा फायदा त्यांना या निवड प्रक्रियेत झाला. व त्यांना भरघोस अशा 187 मतांचा उच्चांक गाठला व अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे  युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 या सत्कार कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांमध्ये रितेश देशमुख, शशिकांत कडू, मनीष दहापुते, विक्रांत मिसार, राजेश कुकडे, हॉटेल मराठाचे संचालक  निलेश कुकडे, भावेश काळमेघ, ताजनेभाऊ, पत्रकार पवन पाटणकर, सागर टोम्पे, प्रतीक कोल्हे, स्वराज मानकर व इतर उपस्थित होते,.


            

 अंशूक ढोक यांची निवड ही युवकांकरिता प्रेरणादायी ठरेल.

 युवकांनी सामाजिक क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा समोर यावे व ग्राम विकास घडवून आणावा युवा वर्ग हा मोठ्या प्रमाणात प्रत्येक बाबतीत परिवर्तन घडवून आणू शकतो. आवश्यकता आहे फक्त ती योग्य दिशा देण्याची.

मंगेश देविदास काळमेघ ,अमरावती जिल्हा उपाध्यक्ष 

(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) लाडकी बहीण योजना कमिटी शासकीय सदस्य

Post a Comment

Previous Post Next Post