Vidarbha Editor Milind Jamnik
मूर्तिजापूर : तालुक्यातील सांगवा मेळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुक्ताई तुळशीराम सामाजिक संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिवाकर सिरसाट होते. यावेळी सरपंच मोहन गावंडे, डॉ. विशाल सिरसाट, समाधान सिरसाट, मदन गावंडे, दिवाकर गावंडे, शरद पाठक, संदीप गावंडे, राजेश सिरसाट, किशोर गावंडे, संदीप सिरसाट, अवधूत सिरसाट, प्रेमदास सिरसाट, ज्ञानेश्वर सिरसाट, रवी इंगळे, रणजित सिरसाट, अमोल गावंडे, मंगल गावंडे, जगदेव चव्हाण, बंडू सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या शौर्य, पराक्रम, स्वराज्य स्थापनेतील योगदान तसेच आदर्श नेतृत्वगुणांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत जयंती सोहळा यशस्वी केला.

