विशेष प्रतिनिधी/ निलेश रामगावकर
तळेगाव दशासर :- छत्रपती संभाजीनगर - नागपूर हायवेवरील तळेगाव, देवगाव ते पुलगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती सद्या झाली आहे. त्यामुळे वाहन चालवीतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तसेच देवगाव ते पुलगाव रोडवरील नागापूर सबस्टेशन जवळ रस्त्याच्या मधोमध मोठ मोठे खड्डे पडलेले आहे.
येथील खड्डे चुकविनाच्या नादात याठिकाणी अनेक अपघात झाले असून दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच एक ते दोन महिन्याआधी रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमता आढळून आल्याने गावकरी व प्रवाशी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ हायवेवरील रस्त्याचे काम करावे जेणेकरून अपघातात प्राण जाऊन कुणाचे कुटुंब उध्वस्त होणार नाही. असे गावकऱ्यांनी बोलतांनी सांगितले..
Tag : #BadRoads #MaharashtraRoads #InfrastructureFail #HighwayWoes #TravelAdvisory #SambhajiNagar #Nagpur #RoadSafety #GovernmentAttention #FixOurRoads #PublicIssue

