दहावीच्या यशासाठी शांत मन, जिद्द आणि आत्मविश्वास अत्यावश्यक : प्रा. अमोल घनवट

 

Gavakadachi batmi

विकास शेलार प्रतिनिधी-

अहिल्यानगर ,शेवगाव :-  शहरातील द्रोणाचार्य कोचिंग क्लासेस सायन्स व करिअर अकॅडमी येथे इयत्ता दहावीच्या १४ व्या बॅचचा निरोप समारंभ प्रेरणादायी वातावरणात उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अमोल घनवट उपस्थित होते.विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. घनवट सर यांनी दहावी बोर्ड परीक्षेचे महत्त्व अधोरेखित करत ठाम संदेश दिला. "परीक्षा ही तणावाची नव्हे, तर तुमच्या तयारी, संयम आणि चिकाटीची खरी कसोटी आहे. शांत मन, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी यश संपादन करू शकतो,” असे प्रभावी मार्गदर्शन त्यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्म विश्वासाची नवी ऊर्जा निर्माण झाली कार्यक्रमाची सुरुवात क्लासचे संचालक प्रा. अमोल दाते यांच्या प्रास्ताविकांने झाली. प्रा. किरण पायघन यांनी परीक्षेचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व उत्त रपत्रिकेतील सादरीकरण याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना देत भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समन्वयक प्रा. गणेश चव्हाण यांनी निरोप समारंभाचे महत्त्व स्पष्ट केले.



यावेळी विद्यार्थ्यांच्या मनोगता मध्ये गणेश गुगळे, अक्षय माळी, रेणुका गाडेकर, प्रियदर्शनी सरोदे व परिणीता कवडे यांनी क्लास मधील अनुभव व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रज्ञा दळे हिने कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.


कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. किरण पायघन सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता प्रेरणादायी वातावरणात झाली.

Post a Comment

Previous Post Next Post