Miss World 2025 Opal Suchata Winner : हैदराबादमध्ये 31 जूनच्या संध्याकाळी रंगलेल्या 72 व्या मिस वर्ल्ड "मिस वर्ल्ड 2025 थायलंडची सुंदरी ओपल सुचाता चुआंगश्री" ही ठरली आहे. मिस वर्ल्ड 2024 क्रिस्टीना स्टेजवर आली आणि तिने सुचाताच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 225 चा मुकुट ठेवला. सुचात ही मिस वर्ल्ड बनणारी थायलंडची पहिली तरुणी आहे.
भारताची सुंदरी नंदिनी गुप्ताचा अपेक्षाभंग जगभरातील 108 स्पर्धकांमधून निवडलेल्या टॉप 40 सुंदरींमध्ये भारताची नंदिनी गुप्ता देखील होती. ज्यावेळी प्रत्येक खंडनिहाय सुंदरींची घोषणा झाली तेव्हा आशिया खंडातून टाॅप 5 मध्ये भारताची नंदिनी गुप्ता ही होती, पण शेवटच्यावेळी तिचा अपेक्षाभंग झाला आणि येथेच भारतीय स्पर्धकांची घोडदौड थांबली.
मिस वर्ल्ड मुकुट किती रुपयांचा?, किती मौल्यवान?
मिस वर्ल्ड मुकुट जितका सुंदर आहे तितकाच तो मौल्यवान आहे. मिस वर्ल्डच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांच्या मते, या मुकुटाची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. हे 18 कॅरेट पांढऱ्या सोन्यापासून बनलेले आहे.
मुकुटात किती आहेत हिरे ?
मिस वर्ल्डच्या मुकुटामध्ये 1770 हिरे आणि 175.49 कॅरेटचे नीलमणी जडवलेले आहेत. त्याचा निळा रंग शांती, निष्ठा आणि शहाणपणाचे प्रतीक मानला जातो.
मिस वर्ल्ड 2025 ओपलला किती बक्षीस रक्कम मिळाले.?
मिस वर्ल्ड 2025 ची विजेती ओपल सुचात हिला 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 8.3 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाले आहे. ही रक्कम मागील वर्षांपेक्षा जास्त आहे.
2017 मध्ये मानुषी छिल्लरला किती रक्कम मिळाली होती.?
2017 मध्ये भारताच्या मानुषी छिल्लरने हा किताब जिंकला तेव्हा तिला सुमारे 10 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. ही रक्कम केवळ त्यांच्या वैयक्तिक विकासातच वापरले जात नाही तर ती मानवतावादी कार्य आणि सामाजिक प्रकल्पांमध्ये देखील गुंतवली जाते.
मिस वर्ल्ड खिताब जिंकणाऱ्याला कोणत्या सुविधा मिळतात?
मिस वर्ल्ड होताच विजेत्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सुविधा मिळतात, यामध्ये
•:• वर्षभर मोफत प्रवास, हॉटेल आणि जेवण, डिझायनर कपडे, मेकअप आणि दागिन्यांची सुविधा
•:• वैयक्तिक पोषणतज्ज्ञ, फिटनेस ट्रेनर आणि स्टायलिस्ट
•:• सर्वोत्तम छायाचित्रकार आणि डिझायनर्ससोबत काम करण्याची संधी
•:• मेकअप कलाकार आणि सहाय्यकांचा समावेश असलेली एक व्यावसायिक टीम
•:• मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनची ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचा मान.
•:• मिस वर्ल्ड ही पदवी केवळ ग्लॅमर आणि ग्लॅमरचे प्रतीक नाही तर एक जबाबदारी देखील आहे.
•:• विजेती 'ब्युटी विथ अ पर्पज'ची जागतिक प्रतिनिधी बनते आणि आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या मुद्द्यांवर