शेगाव येथे आदिवासी विकास परिषदेची बैठक उत्साहात


Buldhana Maharashtra



बुलढाणा,शेगाव : आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची विदर्भस्तरीय समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्या संदर्भात बैठक ७ जून रोजी मंगलम नगर शेगाव येथे दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रामसाहेब चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेचे महासचिव शेषरावजी कोवे होते. तसेच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे व अमरावती जिल्हा अध्यक्ष अशोक चव्हाण, वाशिम जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष सिताताई धंदरे उपस्थित होत्या. बैठकीत आदिवासच्या अनेक समस्यावर चर्चा करण्यात आली तसेच जिल्हा, तालुका ,गांव शाखा अध्यक्ष व कार्यकारणी तयार करून नियुक्ती देणे, समाजावर होणारे अन्याय अत्याचार, निवारणार्थ उपाय योजना सुचविने. त्याचं बरोबर प्रामुख्याने विदर्भस्तरीय आदिवासी समाजाचा भव्य प्रबोधन मेळावा आयोजित करण्यासाठी चर्चा करून ऑगस्ट महिन्यात आदिवासी समाज प्रबोधन मेळावा शेगाव येथे करण्याचे ठरले. तसेच आदिवासी समाजातील गुणवंताचा सत्कार समारोह आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

     यावेळी प्रमुख पाहुणे महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे यांनी संबोधित करताना मेळाव्यासाठी जास्तत जास्त महिलांची उपस्थिती राहण्यासाठी प्रयत्न करू, असे मत व्यक्त केले. तसेच परिषदेचे महासचिव शेषरावजी कोवे आणि वाशिम महिला जिल्हाध्यक्ष सीताताई धंदरे यांनी सुद्धा त्यांचे मत व्यक्त केले, अध्यक्षयीय भाषणात रामसाहेब चव्हाण यांनी विदर्भातील सर्व आखिल भारतीय परिषद ही आदिवासी समाजासाठी मागिल ६० वर्षापासून काम करत असून सम्पूर्ण देशात परिषदेचे जाळे आहे.

    त्यामुळे डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळत आहे. तसेच विदर्भस्तरीय मेळाव्याचे चांगले नियोजन करून तन मन धनानी हा समाज प्रबोधन मेळावा पार पाडण्यासाठी सर्व कार्यकर्त्याला आवाहन केले. बुलडाणा जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या दिल्या व सर्व पदाधिकारीचे स्वागत केले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोपान सोळंकी नवनियुक्त चिखली तालुकाध्यक्ष बाळू ढंगारी तसेच बबन गायकवाड, सुखदेवराव डाबेराव, श्याम कुमार डाबेराव, गजानन पवार, हरिदास सोळंके, प्रल्हाद पवार, समाधान सोळंके, किसन चव्हाण, ईश्वर पवार, मुरलीधर पवार, मधुकर चव्हाण, प्रफुल चव्हाण, विजय राठोड, भिकाजी डाबेराव, रमेश पवार, अमोल पवार, किसन चव्हाण, गणेश पवार, महादेव पवार, आकाश डाबेराव, वासुदेव बोरकर यांच्यासह जिल्ह्यातील आदिवासी समाज मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post