विनापरवानगी सुरू असलेले रिलायन्स बायो गॅस सीएनजी प्रकल्पाचे काम त्वरित थांबवा

 

 

Immediately stop the work of the Reliance Bio Gas (CNG) project which is going on without permission....

 

विनापरवानगी सुरू असलेले  रिलायन्स बायो गॅस सीएनजी  प्रकल्पाचे काम त्वरित थांबवा...

 


 225 विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतय जिल्हा प्रशासन.... मुख्यमंत्री, पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्याधिकारी गप्प का... अनिल हमदापुरे.


       यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत 

 मौजा उत्तरवाढोणा ता.नेर जि. यवतमाळ येथे कोणत्याही कार्यालयाची बांधकाम परवानगी, विकास परवानगी, अकृषक दाखला  परवानगी, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र परवानगी  नसतांना वसंतराव नाईक विद्यालय उत्तर वाढोणा शाळेजवळ सी. एन. जी. प्लॉन्ट चे बांधकाम सुरू आहे. जिल्ह्यात 225 विद्यार्थ्यांचे जीव  दावणीला टांगले असताना मुख्यमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, जिल्हाधिकारी, जि प मुख्याधिकारी गप्प का असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  आज विषयाच्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना या विषयाचे निवेदन देत तात्काळ रिलायन्स बायोगॅस प्लांट चे काम बंद करण्याची मागणी करत  या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष  देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या  निवेदनातून  देण्यात आला.

मौजा उत्तरवाढोणा येथे रिलायंस लिमिटेड कंपनी कोणत्याही कार्यालयाची NOC / नाहरकत परवानगी न घेता सी. एन.जी.प्लॉन्ट चे बांधकाम चालु केले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये  एवढ्या मोठ्या प्रमाणात  अवैध  काम सुरू असताना जिल्हा प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. जिल्ह्यातील 225 विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात असताना अद्याप पर्यंत कोणतीच कारवाई या प्रकल्पावर करण्यात आली नाही. वास्तविकेत यापूर्वीही  स्थानिक ग्रामपंचायतील नागरिकांनी  या प्रकल्पात विरोधात आवाज उठवूही यावर कोणतीच कार्यवाही  झाली नाही. विद्युत महामंडळाने तर चक्क   सदर कंपनी कागदपत्रे पडताळणी न करता विद्युत पुरवठा चे डिमांड काढले वरून रिलायंस कंपनीच्या काही व्यक्तींनी मिटर जोडणी संदर्भात डिमांड काढुन घेतले आहे. विद्युत महामंडळाचे अधिकाऱ्यांनी या प्रकरणात नागरिकांच्या मागणीला कानाडोळा करत सर्व नियमांना डावलून सदर कंपनीला विद्युत पुरवठा देण्यात आला. सदर प्रकरणात कार्यकारी अभियंता विभाग दारव्हा, उप कार्यकारी अभियंता उपविभाग, नेर, सहा. अभियंता केद्र मालखेड (खुर्द) यांचे सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. सदर प्लॉन्ट हा शाळेजवळ लागुन असल्याने परिसिरातील सर्व लोकांचा या प्लॉन्ट ला विरोध होत आहे. सदर प्लॉन्टच्या जवळ असलेल्या शाळेत 225 विद्यार्थी शिक्षण घेत आहे हा प्लॉन्ट जर शाळेजवळ सुरू झाला ध्वनी प्रदुषण, वायु प्रदुषण होवून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर तसेच शिक्षणावर परिणाम होणार आहे.

उज्वल भारत


     उद्या जर सी. एन. जी. गॅस च्या टाकीचा काही कारणास्तव विस्फोट झाला तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न जिल्हाधिकारी यांना  मनसेचे  अनिल हमदापुरे यांनी विचारत  उद्या जर काही घटना घडल्यास  त्याची जबाबदारी  जिल्हा प्रशासन घेणार का  असा सवाल केला. जिल्हा प्रशासनाने या सर्व विद्यार्थ्यांची जीविताची हमी घ्यावी अन्यथा प्रकल्प रद्द करावा. सदर प्रकल्पाला  गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर  पंचायत समिती नेर चे विस्तार अधिकारी पी. एम. पंडित यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देऊन  अहवाल सादर केला आहे. सदर अहवालानुसार  या प्रकल्पाला  विकास परवानगी, अकृषक दाखला, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र, नसतांना तसेच ग्रामपंचायत उत्तर वाढोणा, व वसंतराव नाईक विद्यालय  उत्तर वाढोणा यांचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना हा प्रकल्प सुरूच कसा झाला  हा मुख्य प्रश्न आहे. 

    सामान्य नागरिकांनी  कोणतेही नियमबाह्य काम केल्यास लगेच त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते  परंतु इथे मात्र  225 मुलांच्या जीवाचा प्रश्न असून सुद्धा  यावर संपूर्ण प्रशासन गप्प आहे हे न उलगडणारे  कोडे आहे. बहुदा प्रशासनावर  अंबानी या नावाचा दबाव असावा  असा संशय मनसेने व्यक्त केला. मुलांच्या शिक्षण, मुलांचे अपघात, मुलांचे, गावातील स्थानिक नागरिकांचे  आरोग्य लक्षात घेता वरील प्रकल्पाला तात्काळ रद्द करून जिल्ह्यात इतरत्र तो प्रकल्प हलवावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने सदर प्रकल्पाविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन पुकारण्यात येईल असा निवेदन वजा इशारा याप्रसंगी  मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, शिवम नांदुरकर, तुषाल चोंडके, सौरभ अनसिंगकर, नक्की छांगणी, बबलू मसराम, अक्षय सुरटकर यांनी याप्रसंगी दिला. सदर निवेदनाच्या प्रती  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले असून, जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मनसेचा लढा सुरू राहील असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.





Post a Comment

Previous Post Next Post