अमरावती, राजाभाऊ वानखडे : गुरुवार,दिनांक 05/06/2025 रोजी भिमक्रांती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणविस साहेब यांना मा.जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांचे मार्फत संजय गांधी निराधार व श्रावण बाळ वृध्द निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या 6 ते 7 महिन्यापासून मानधन मिळाले नाही. ते त्वरीत मिळण्यात यावे याबाबतीत निवेदन पत्र देण्यात आले.
प्रमुख मागण्या :-
1) शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीन योजनेसाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडे वळविलेला 746 कोटी निधी त्यांच्या मूळ खात्यात परत करावा.
2) संजय गांधी निराधार व श्रावणबाळ वृध्द निवृत्ती वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाची रक्कम 1500 रुपये वरुण 5000 रुपये मानधान वाढविण्यात यावे याबाबत.
3) अपंग,निराधार,वृध्द पेंशन,परीतक्ता,विधवा यांना मिळणारा संजय गांधी निराधार व श्रावणबाळ वृध्द निवृत्ती वेतन योजनेचा निधी त्वरीत आठ ते दहा दिवसात पात्र लाभाथ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे याबाबत.
निवेदनामध्ये असे म्हटले आहे की
महाराष्ट्र राज्य शासनाने लाडकी बहीन योजनेसाठी महिला बाल विकास मंत्रालकडे 410 कोटी 30 लाख रुपये इतका सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाचा निधी वळविला ही माहीती खुद सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली व त्या बद्दल संताप व्यक्त केला.राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी इतरत्र वळविल्यामुळे अनेक अपंग,निराधार,विधवा, परितत्या व तसेच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ वृद्ध निवृत्ती वेतन योजनेचे पात्र लाभार्थी यांना गत 6 ते 7 महिण्यापासुन मिळणारी लाभाची रक्कम मिळाली नसल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. वृद्ध,अपंग,विधवा यांना याच योजनेचा आधार असल्यामुळे त्यांना औषधी,अन्न धान्य व उदरनिर्वाहाचे साधन नसलेल्यांना खुप अडचनिंचा सामना करावा लागत असुन त्यांना भिक मागण्याची वेळ आली आहे. सरकारने या विषयाकडे गाभिर्याने लक्ष द्यावे व या सोबतच सदर निराधार वृद्ध,विधवा,अपंग यांना मिळणारे तुटपुंजे रुपये 1500 मासिक मानधान मिळते त्यातही 6 ते 7 महिण्यापासुन त्यांना या लाभापासुन जाणिवपुर्वक वंचित ठेवल्या जात आहे.रुपये 1500 मध्ये निराधारांचे उदरनिर्वाह,औषधी उपचार होणे आजच्या महागाईच्या युगात कठीण झाले असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.तरी मायबाप सरकारने त्यांचे मासिक मानधन 1500 रुपये वरुन वाढ करुन 5000 रुपये मानधन करण्यात यावे सोबतच महाराष्ट्र राज्य शासनाने लाडकी बहीन योजनेसाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडे वळविलेला सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाचा निधी शासनाने परत करावा तसेच अपंग,निराधार, वृध्द,परितक्त्या,विधवा यांना मिळणाऱ्या लाभाच्या योजना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ वृध्द निवृत्ती वेतन योजनेचा निधी त्वरीत आठ ते दहा दिवसात पात्र लाभार्थयांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा.
यासोबतच मागासवर्गीय,अनुसूचित जाती तसेच आदिवासी यांच्यावर केला अन्याय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बजेटमधून 410 कोटी 30 लाख रुपये आणि आदिवासी विकास विभागाच्या खात्यातून 335 कोटी 70 लाख रुपये असे एकूण 746 कोटींचा निधी लाडक्या बहिणीच्या खात्यात वळते करून टाकले.
म्हणजे मागासवर्गीय,अनुसूचित जाती,आदिवासी यांच्या हक्काचा पैसा ओरबाडून त्याचा वापर इमेज बिल्डिंगसाठी करणार? हा निधी त्यांच्या शिक्षण,रोजगार,निवास योजनांसाठी असतो आणि तुम्हाला तो पैसा इतर खात्यात वळवण्याचा अधिकार नाही.
हा प्रकार केवळ आर्थिक लुट नाही- हा थेट अन्याय आहे!
हा पैसा त्यांच्या भविष्यासाठी आहे,ना की तुमच्या ब्रँडिंगसाठी आणि यापुढे या खात्यांमधील जी काही रक्कम दरवर्षी उरेल,त्याला पुढील वर्षाकरिता कॅरिफॉरवर्ड करण्यात यावी.तो निधी इतर खात्यांमध्ये वळवणं म्हणजे हक्काची चोरी आहे..
आम्ही संघटनेच्या वतीने याचा तीव्र निषेध करतो आणि सरकारला स्पष्ट शब्दांत सांगतो हा पैसा मूळ खात्यांमध्ये परत द्या.सदर निवेदनाची गांभिर्याने दखल घेण्यात यावी अन्यथा भिमक्रांती सामाजिक संघटना,महा.राज्य संघटनेच्या वतिने राज्यभर तिव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भिमक्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर यांनी दिला.नि
वेदन देते वेळी संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर,अमरावती वि.स.महिला अध्यक्षा सरिता खंडारे,संत कबीर नगर शाखा अध्यक्षा मंगला वानखडे, कमल खंडारे, रंजना डोंगरे,आशाबाई वडे,परमानंद खीराळे,मनोज खंडारे,अमरावती कामगार जिल्हा अध्यक्ष सुमीत गणवीर,रुपेश कुत्तरमारे,शांतीबाई शाहू,सुनंदा खंडार,सुमन मेश्राम इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.