शासनाची पुरग्रस्तांच्या पुनर्वसनात दिरंगाई ! लाभार्थ्यांना लवकरच मदत मिळावी - मोहम्मद सईद

 


DistrictCollectoramravati

District Collector Amravati

            विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव 

अमरावती, अचलपूर, असदपूर : पुरपिडीत लाभार्थी हे वार्ड क्र. १ ते ४ मौजे- असदपूर ता. अचलपूर जि. अमरावती येथील कायमस्वरुपी रहिवासी असून सर्व लाभार्थी चंद्रभागा सापन बृहत प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्राच्या लाभापासून सन २००७ ते आजपावेतो त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा त्यांचे सदर कोणत्याही ठिकाणी पुनर्वसन झालेले नसून सदर सर्व लाभार्थी हे अनुसूचित जाती व जमातीमधील असून त्यांची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असून सदर पुरग्रस्तांना तातडीने पुनर्वसनाची गरज आहे.



 सर्व प्रकरणाची शहानिशा करुन आपण त्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा ही विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हा संगठन प्रमुख मोहम्मद सईद व जिला कार्यकारिणी सदस्य कालीन सौदागर, रंजीत वाघमारे , कैलाश पाकरे, असद अली नवाब स ,शहादेव वाघमारे, साहेबराव वाघमारे, प्रकाश थोरात, साहेबराव थोरात,नामदेव ठोमरे, तुकाराम स्वर्गीय, गजानन वाघमारे, साहेबराव नने शंकरराव वाघमारे, नारायण खंडारे,नईम भाई,अभिजित गावंडे युवक अध्यक्ष भातकुली, श्याम ढवले संपर्क प्रमुख भातकुली उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post