श्रमसाफल्य घरेलू कामगार संघटने अंतर्गत जागतिक घरेलू कामगार दिवस साजरा

 

Amaravatinews

Gavakadachi Batmi gavsheli news network 


Ujjwal bharat mahila


Amaravatinews :  अमरावती मधील राहुल नगर येथे घरेलू कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित शितल वाघमारे यांनी घरेलू कामगारांसाठी कोणकोणत्या योजना आहेत तसेच त्या योजनांची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी यासाठी महिलांनी एकत्रित येऊन सरकारला आव्हान करण्याची गरज आहे याविषयी मार्गदर्शन केले. 

निलिमा भटकर यांनी महिलांना कायदेविषयक अंतर्गत माहिती दिली तसेच घरेलू कामगारांना कायदेविषयक ज्ञान असणे महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रीती मून(समुपदेशक जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती) यांनी घरेलू कामगार महिलांना काम करताना होणाऱ्या आरोग्याच्या समस्या या विषयी मार्गदर्शन केले. 



   कार्यक्रमाला उपस्थित भाग्यश्री खडेकार अध्यक्ष (श्रमसाफल्य घरेलू कामगार संघटना ) जोशना वानखडे, शुभांगी वरघट, ईश्वरी तायवाडे, सुजाता तायडे, राणी बनोदे, पल्लवी खंडारे, सुनिता धाकडे, छाया टेंभुर्णे, गीता धरमपल्ली व इतर सर्व घरेलू कामगार उपस्थित होते. घरेलू कामगार संघटने अंतर्गत सरकारकडे काही मागण्या आहेत त्या पुढील प्रमाणे १) घरेलू कामगारांच्यारां काही प्रमुख मागण्या आहेत.२) कामगारांची नोंदणी ही त्वरित चालू करावी ३) घरेलू कामगारांसाठी त्रिपक्षीय मंडळामध्ये घरेलू कामगारां च्या संघटनांना समाविष्ट करण्यात यावे.



 ४)राज्यात तालुका पातळीपर्यंत घरेलू कामगारांना नोंदणीकृत करणारी सक्षम यंत्रणा स्थापन करावी. ५) घरेलू कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ,घरेलू कामगारांना अपघाती विमा या प्रमुख मागण्या सरकारकडे मागत आहोत. याविषयी संघटनेमार्फत एल्गार करण्यात आला..

Post a Comment

Previous Post Next Post