घरकुल नोंदणी साठी मुदतवाढ ! मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या निवेदनाची शासनाने घेतली दखल !
मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या निवेदनाच्या मागणी वरून वृत्तपत्र व प्रसार माध्यमाने बातमी प्रकाशित करून पाठपुरावा केल्यामुळे शासनाला घरकुल नोंदणी साठी मुदतवाढ देण्यास भाग पाडले.
घरकुल नोंदणी करिता आवास प्लस ॲप ची दिनांक.4/जून/2025. रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला दिनांक. 18/ जून/2025. पर्यंत मुदतवाड देण्यात यावी म्हणून आदेशित करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांचे नोंदणी करायची राहिली असेल आशा लाभार्थ्यांनी आवास प्लस या ॲप वर लवकरात लवकर नोंदणी करून घ्याव्यात. आवाज प्लस च्या माध्यमातून नोंदणी करत असताना घरकुल लाभासाठी पात्र असताना देखील ॲपच्या तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी न झाल्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना नोंदणी करिता येत नव्हती म्हणून मुदतवाढ देण्यात यावी यासाठी मा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड. दिनांक. 30/जून/2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते. निवेदनाच्या गांभीर्य लक्षात घेत सर्व वृत्तपत्र माध्यम आणि बातमी प्रसारित केल्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटकांना शासनाकडून देण्यात येणारे घरकुल लाभार्थ्यांना पात्र असताना देखील आज पर्यंत शासनाकडून अधिकृत आवाज प्लस या ॲपद्वारे नोंदणी करण्या साठी म्हणून दिनांक 31/05/2025. ही शेवटची तारीख देण्यात आली होती.
परंतु आवाज प्लस ॲपच्या तांत्रिक अडचणी मुळे अनेक पात्र लाभार्थीची नोंदणी होऊ शकली नसल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांच्या वर होत असलेल्या अन्याय होऊ नाही. आवास प्लस आप द्वारे करण्यात येणाऱ्या नोंदणी करता याव्यात म्हणून मुदतवाढ देऊन सर्व पात्र लाभार्थ्यांना नोंदणी करण्या साठी मुदतवाड देण्यात यावी म्हणून य विनंती करण्यात आली होती केंद्र शासनाने दिनांक.04/06/2025 रोजी. आदेशित करून मुदतवाढ दि.18/ जून /2025 पर्यंत देण्यात आली आहे. असे केंद्र शासनाने परिपत्रकाद्वारे महाराष्ट्रात लागू केले आहे. एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्ह्यात जनतेच्या अनेक वेगवेगळ्या समस्या ला समजून हाती घेतलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर आहे..