अत्यंत गरजू महिला भगिनी सौ.ज्योती भूरभुरे यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी गृह उद्योगाच्या माध्यमातून पीठ गिरणी द्वारे मदतीचा हात..
विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
अमरावती : माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या भरीव सहकार्यामुळे व जिल्हा परिषद अमरावतीच्या लोकाभिमुख योजनेमुळे जळका शहापूर तालुका जिल्हा अमरावती येथील कर्तव्यदक्ष महिला भगिनी ज्योती भुरभुरे यांना दर्जेदार पीठ गिरणी प्रदान
दि.7/6/2025 रोजी जळका शहापूर येथे महिला भगिनी ज्योती भुरभुरे यांना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या शुभहस्ते पीठगिरणी प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच ज्ञानदीप मुंद्रे, मोहन इंगळे, विनोद खेडेकर, किशोर वानखडे, किशोर भगत, मनीष पन्नासे, स्वप्निल शिरसाट, सुरज मानकर, बाल्याभाऊ भगत व गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
कष्टीक व सक्षम महिलांना रोजगारक्षम बनवण्यासाठी गृह उद्योगाच्या माध्यमातून शासनाचा निधी महिला भगिनी पर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध -प्रकाश साबळे यांचे मनोगत.याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने प्रकाश साबळे यांचा भावनिक सत्कार करण्यात आला.