चांदुर बाजार तालुक्यातील रीद्धपूर ते जालनापूर इ. जी. मा.-१७ रस्त्याच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे - योगेश ईसळ यांचे जिल्हा परिषद ला निवेदन

 

Amaravatinews


चांदुर बाजार तालुक्यातील रीद्धपूर ते जालनापूर इ. जी. मा.-१७ रस्त्याच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे - योगेश ईसळ यांचे जिल्हा परिषद ला निवेदन


         जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर 

शिराळा : चांदुर बाजार तालुक्यातील रिद्धपूर ते जालनापुर हा रस्ता दोन तालुके जोडल्या जाते रिद्धपूर हे मोर्शी तालुक्यातील गाव आहे परंतु रिद्धपूर ते जालनापुर इ.जी.मा.-१७ रोडवरील संरक्षण भिंतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आज रोजी सुरू आहे हे  जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत येते.पावसाळ्याला सुरूवात झाली असून अजुन ही या कामाला अतीशय मंद गितीने हे काम सुरू आहे. या बांधकामासाठी नाल्या मधील माती मिश्रण रेतीचा वापर होत आहे व सर्व प्रकार तक्रारकर्ता योगेश इसळ यांनी आपल्या मोबाईल मध्ये फोटो व व्हिडिओ काढले आहेत.हा सर्व प्रकार जिल्हा परिषद उप अभियंता नितीन झगडे यांना मोबाईल फोन वर व्हिडिओ - फोटो पाठवुन सुध्दा काम अद्यावत सुरूच आहे पावसाळ्याच्या पाण्यात निकृष्ट दर्जाचे बांधकामामुळे काही हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहिल अशी माहिती तक्रारकर्ता यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post