तब्बल चौथ्यांदा केलं सौंदर्य स्पर्धेच यशस्वी आयोजन
जिल्हा प्रतिनिधी,श्रीकांत राऊत यवतमाळ
उमरखेड तालुक्यातिल मेट येथील सुपुत्र ज्ञानेश्वर चव्हाण यांची किमया
ग्लॅमर फॅशन आयकॉन” या भव्य सौंदर्य स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला. किड्स, टीन, मिस, मिसेस आणि मिस्टर या सर्व कॅटेगरीजमधील विजेत्यांना ट्रॉफी, क्राऊन, सर्टिफिकेट, सॅश आणि आकर्षक गिफ्ट्स देण्यात आले. स्पर्धकांसाठी खास फोटोशूट, स्टायलिश आऊटफिट्स, मेकअप, हेअरस्टाईल व प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती.
प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मंचावर आपली कला दाखवण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक, ट्रेनर्स, कोरिओग्राफर्स व संपूर्ण टीमने मोठे योगदान दिले.
या भव्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, जे शंकर मुळे यांच्या हस्ते पार पडले. शोचे दिग्दर्शन ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन तन्वी मुळे आणि काजल कोर्डे यांनी केले. रूपाली मुळे आणि मीनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते – नितीन बोधे सर आणि कारेश्वर इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्या स्नेहलता मॅडम.
गणेश वंदना सादर केली रॉयल डान्स अकादमीने, ज्यांचे प्रशिक्षण माधुरी जायभाये यांनी दिले होते.
कार्यक्रमात मुलं, किशोर, मिस, मिसेस, मिस्टर आणि रनवे मॉडेल अशा विविध गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण १७० स्पर्धकांनी सहभाग घेतला
नृत्य दिग्दर्शन – अनिकेत पारेख, तन्वी मुळे, काजल कोरडे
ज्युरी पॅनेल
• आंतरराष्ट्रीय मॉडेल – शेमोनील वांकाडिया international model
• NSG कमांडो – जगदीशचंद्र देसले आणि उमा बलोरिया
सूत्रसंचालन – प्रसिद्ध अँकर नीलेश पापट आणि रविकांत बाबर