अक्षर मानव तर्फे वैभव साठे यांचा अमरावती मध्ये सत्कार
डॉ. वैभव साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
अक्षर मानव महाराष्ट्राचे मुख्य पदाधिकारी राज्य कार्यवाह आझाद खान आवर्जून उपस्थित
अमरावती:- अक्षर मानव संघटने कडून साहित्य,समाज, आरोग्य, कला, शिक्षण, पर्यावरण, श्रम आणि विज्ञान या विषया सहित माणसांच्या जगण्याच्या 70 अधिक विषयात काम करते. या विषयांच्या अनुषंगाने विविध संमेलने, शिबीरे, कार्यशाळा, लेखन कार्यशाळा, गप्पा, संवाद सहवास अशा प्रकारचे उपक्रम सुरू राहतात.
सिकची रिसोर्ट,वलगांव, अमरावती येथे झांसी च्या राणी लक्ष्मीबाई यांचे सहावे वंशज, योग गुरू, नाडी परिक्षण व मर्म थेरपी तज्ज्ञ डॉ. वैभव साठे दादा यांचे अक्षर मानव अमरावती जिल्हा कार्यकारिणी तर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र अक्षर मानवचे राज्य कार्यवाह, आझाद खान हे सुद्धा आवर्जून या संवाद सहवास व सत्कार सोहळा प्रसंगी उपस्थित होते. सत्कार करण्याच्या सोबत वैभव दादा सोबत छोटेसे एकदिवसीय संवाद सहवास कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.
अक्षर मानव ही संघटना सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन समाजाच्या भल्यासाठी काम करणारी माणसांची संघटना आहे. कुटुंब आणि समाजव्यवस्था दुरुस्त करण्याचं काम करते. माणसांमाणसातील सर्व भेद मिटवून वाद मिटवून सर्वांना समान पातळीवर आणून माणसाला माणूस जोडण्याचं काम आम्ही करतो या मध्ये प्रामुख्याने जाती, धर्म, देव, वर्ण, लिंग, भ्रष्टाचार यांच्या पलीकडे माणसं एकत्र आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. दंगली, भांडणे,माऱ्यामाऱ्या, युद्ध, तंटे, या सर्व गोष्टींचा आम्ही विरोध करतों. माणसांच्या मेंदुतही सतत शांतता अखंडपणे नांदली पाहिजे. भारतभर सर्व माणसं सुखी, समाधानी, आनंदी, निर्मळ, नेक, प्रामाणिक जगली पाहिजे. माणसांच्या मेंदूत असलेल्या माणसाबद्दल जलसीपणा, द्वेष, मत्सर, राग, घृणा, तिरस्कार, आम्हाला हे संपवता आलं पाहिजे म्हणून आम्ही अक्षर मानव संघटने मार्फत राज्यभर मानवी हिताचे उपक्रम घेत राहतो. असे मत अक्षर मानव चे राज्य कार्यवाह तथा विदर्भाचे पालकमंत्री आझाद खान यांनी आपल्या अक्षर मानवची भूमिका वैभव दादा समोर मांडली.
भारतात योग, पंचकर्म, मर्मथेरपी, प्राणायाम आहे. या सुविधा सर्व सामान्य माणसाला परवडणाऱ्या आहेत. आम्ही सर्व सामान्य माणसाची गावात राहणाऱ्या एका साधारण नागरिकासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, आदिवासी बंधु भावा साठी काम करतो. समाजात प्रत्येक व्यक्तीचं आहार, आरोग्य व जीवनशैली बदलली आहे. या मुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांना अनेक विविध आजारांची लागणं झाली आहे. या समस्येतून बाहेर येण्यासाठी आपला शेतकरी,शेत मजूर, गरीब माणूस आपलं राहतं घर, शेती, प्लाॅट त्याला विकावे लागते. आणि तो दवाखाने करतो एव्हढे दवाखाने करूनही त्यांना आराम पडत नाही. त्यांना आम्ही मार्गदर्शन व मदत करतो. भारतात आणि भारताबाहेरही मी असे उपक्रम घेत राहतो असे आपले मत या प्रसंग व्यक्त केले तसेच या संवादी कार्यक्रम पाहून वैभव दादा यांनी अक्षर मानव संघटना जी मानवी मुल्य समाजात रुजवण्यासाठी काम करत आहे. या कामात मलाही सहभागी व्हायला आवडेल असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
असे संवादी उपक्रम घेऊन माणसं सतत एकत्रित आली पाहिजे. भेटली पाहिजे, त्यांच्या ओळखी झाल्या पाहिजेत माणूस म्हणून एकमेकांबद्दल त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा म्हणून असे माणसांच्या विकासाचे उन्नतीचे उपक्रम झाले पाहिजे. माणूस हा फक्त माणूस म्हणून जगला पाहिजे. जगभरातले सर्व भेद संपले पाहिजे. माणूस मेंदुने सुधारला, बुद्धिमान झाला, विचारशील झाला तरच जगातले असंख्य मानवी प्रश्न सुटतील असे प्रतिपादन अमरावती अक्षर मानवाच्या जिल्हा सचिव अश्विनी वितोंडे यांनी आपले मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कोकाटे तर आभार प्रदर्शन साकेत ठाकुर यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी मोहनलाल राठोड, शिवाजी कोकाटे अश्विनी वितोंडे,आझाद खान,सारिका कोकाटे, साकेत ठाकुर,राहुल दहातोंडे, किर्ती दहातोंडे, भुषण साबळे,भावना काळे, अमोल भोजने, सुचिता भोजने, किशोर आमले, मुकुंद भक्ते, पुजा भक्ते, मंगेश मानकर, श्रद्धा मानकर, अशोकरावजी जीवरकर, स्वाती बहेकर, अक्षर मानवच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.