घाणीच्या साम्राज्या सह विविध समस्या चे माहेरघर बनले नेरपिंगळाई


Grampanchayat

 

 घाणीच्या साम्राज्या सह विविध समस्या चे माहेरघर बनले नेरपिंगळाई ; ग्रामपंचायतचे दुर्लक्ष कार्यकाळ संपण्यापूर्वी सरपंच लक्ष देतील का..?


 ‌नेरपिंगळाई, प्रमोद घाटे :  मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथिल ग्रामपंचायत च्या मनमानी कारभारामुळे व जानुन बुजुन हेतुपुरस्सर गावातील समस्ये कळे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा गावात जागोजागी होत आहे. गावाच्या सुरवात पासुन ते शेवटपर्यंत समस्याच समस्या पहायला मिळतात ओंकार नगरी, श्रावण नगरी,गणपतगिर नगर परिसरा सह इतरत्र हि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, पिण्याच्या पाण्याचा वास संडासाच्या पाण्या सारखा येत आहे , घंटा गाडी सुध्दा ग्रामपंचायत मध्ये देखाव्यासाठी ठेवली आहे. रोड बांधकाम सुध्दा निकृष्ट दर्जाचे केल्या जात आहे. ओंकार नगरी मधे कित्येक वर्षांपासून रस्ते नाही, नाल्या नाही, इलेक्ट्रिक खांबावर लाईट नाही. निवेदन, तक्रारी देऊन सुद्धा दुर्लक्ष केल्याजात असल्याची चर्चा गावामध्ये सध्या सुरू आहे. असलेल्या ग्रामपंचायत चा कार्यकाळ पाच सहा महिने बाकी आहे कार्यकाळ सरते शेवटी गावातील समस्ये कडे ग्रामपंचायत लक्ष देतिल का याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.


Tags: grampanchayat, GavakadachiBatmi,  Maharashtra, zila parishad amaravati, panchayatsamiti, गावाकडची बातमी, ग्रामपंचायत नेरपिंगळाई, मोर्शी पंचायत समिती, जिल्हा परिषद अमरावती, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी अमरावती, तालुका आरोग्य अधिकारी मोर्शी 





Post a Comment

Previous Post Next Post