Gavakadachi Batmi network
अमरावती : जागतिक पर्यावरण संवर्धन दिन, बकरी ईद सप्ताह व जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर, व समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रम, राधानगर, अमरावती येथे रविवार, १५ जून २०२५ रोजी पार पडले.
या शिबिरात एकूण ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचे उदाहरण घालून दिले. यामध्ये पती-पत्नी जोडीने रक्तदान करणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मोनाली सदावर्ते-चेतन सदावर्ते, दिक्षा गहूकर-गणेश गहूकर, मनाली इंगळे-अभिजित इंगळे या जोड्यांचा शाल, पुस्तक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शिबिराचे अध्यक्ष श्रीधरराव डहाके (सचिव, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट) होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. अरुणा वाडेकर (महिला महाविद्यालय, अमरावती) यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून डॉ. सतीश तराळ, प्रमोद कोळमकर (उपाध्यक्ष, महा. अंनिस अम.), हर्षा सगणे (अध्यक्ष, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन), मनिष पाटील (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), महेश देशमुख (अध्यक्ष, ओबीसी मुक्ती मोर्चा), मनिष गणेशपुरे (संघर्ष संस्था), मो. अफसर भाई (समन्वयक बकरी ईद रक्तदान सप्ताह, महा. अंनिस अम.) आदी मान्यवर उपस्थित होते.
मोफत दंत तपासणी शिबिरात १०४ नागरिकांनी लाभ घेतला. डॉ. मोहम्मद नवेद (रूट कॅनल स्पेशालिस्ट) आणि त्यांच्या चमूने तपासणीसह मोफत औषधांचे वितरण केले.
शिबिराचा मुख्य हेतू बकरी ईदच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या कुर्बानीऐवजी रक्तदान करून मानवतेचा संदेश समाजात पोहोचवणे हा होता. कार्यक्रमात ६ सामाजिक कार्यकर्त्या महिला व ३ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.रक्तदान व दंत तपासणी शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल कुकडे (जिल्हा कार्याध्यक्ष महा. अनिस अम.) यांनी केले.उदघाटक
प्रा. डॉ. अरुणा वाडेकर यांनी मार्गदर्शन करताना समाजात मानवता जपणाऱ्या अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधरराव डहाके यांनी गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टकडून अशा उपक्रमांना सातत्याने सहकार्य दिले जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप लाडे यांनी तर आभारप्रदर्शन हर्षा सगणे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल ठाकरे, दिलीप लाडे, प्रफुल्ल कुकडे, मोनाली व चेतन सदावर्ते, दिक्षा व गणेश गहूकर, मनाली व अभिजित इंगळे, आशिष देशमुख, प्रवीण बुबना, मयूर विघे, शुभम दमाहे,स्वप्नील सगणे, विजया करोले, कीर्तिका सयामे, भाग्यश्री खडेकर, तेजस्विनी ठाकरे, श्वेता कोल्हे, भारत पाटील,गौरव शेळके, चंचल बनसोड, दिगंबर मेश्राम,सुनीता रामटेके,अरविंद विंचूरकर,योगेश काळे, राजेश वानखडे, अनिल तिखीले,दिनेश राऊत,रफिक अहमद, याह्याखां पठाण, दिलबर शहा, देवेंद्र भोंडे (गावाकडची बातमी संपादक),प्रशांत करोले,डॉ. मानवतकर, डॉ. रजनी रावरकर, डॉ. रोशन चौधरी, डॉ. वैष्णवी भुसारी, डॉ. श्रुती राऊत, जगदीश करोले,अनुज म्हस्के विनोद मेश्राम, मदन खंडारे.यांचे विशेष योगदान लाभले.
रक्तसंकलनात मेळघाट ब्लड बँक व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे, तसेच डॉ. नवेद व त्यांच्या दंत वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा आदर्श निर्माण करणारा ठरला.