आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजीत कलाकार बॉक्स क्रिकेट लीग – 2025 कलावंतांच्या जोशपूर्ण उत्साहात संपन्न..!

 

Maharashtra

मुंबई, परेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) 

आर्यारवी एंटरटेनमेंटच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या यशस्वी पर्वानंतर आर्यारवी एंटरटेनमेंटने प्रथमच कलाकार बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन केले होते. ह्या बॉक्स लीगचे उदघाटन प्रसिद्ध समाजसेवक सन्माननीय डॉ. कौतिक दांडगे सर (संस्थापक, अध्यक्ष - महाराष्ट्र बाजार पेठ) यांच्या हस्ते नुकतेच परेल येथील टर्फ मैदानावर नारळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी आर्यारवी एंटरटेनमेंट प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा श्री महेश्वर भिकाजी तेटांबे, प्रसिद्ध समाजसेवक सुशांत साळुंखे, आयोजक राजवीर जाधव, प्रबोधन शिरवाडकर, प्रणेश लोगडे, लक्ष्मी मनीष गुप्ता, अविनाश राऊत, संचित यादव, सागर डोके, संदीप भाकरे, अविनाश राऊत, समीर काळबे, सिने ग्राफिक डिझायनर मनीष व्हटकर, प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अनंत सुतार, रमेश यादव सर आदी मान्यवर उपस्थित होते. ही बॉक्स क्रिकेट लीग फक्त एकांकिका, नाटक, दूरदर्शन, मालिका आणि सिनेमा यातील कलावंतापुरता मर्यादित होती. या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने “साठेची कार्टी”, “सिने डान्सर”, “मोरया”, “कर्टन कॉल”, “ॐ साई प्रॉडक्शन”, “भावकादेवी प्रॉडक्शन”, “स्वामी समर्थ कलामंच” आणि “के स्टार”. परेल वर्कशॉप जवळील मध्य रेल्वे मेकॅनिक्स इन्स्टिटयूट पोल मुंबई १२ क्रिकमेनिया ग्रीनलंड या टर्फ मैदानावर रंगलेल्या उत्साही वातावरणातील जोशपूर्ण अशा अटीतटीच्या आणि मनोरंजकपूर्ण सामन्यात मुंबईच्या “सिने डान्सर” संघाने बाजी मारून कलाकार बॉक्स क्रिकेट लीग - २०२५ चा कै.भिकाजी महादेव तेटांबे आणि कै.मनोरमा भिकाजी तेटांबे यांच्या स्मरणार्थ प्रथम विजेता चषक पटकावला तर "मोरया" संघाने कौतिक दांडगे यांच्या सौजन्य प्रित्यर्थ उपविजेता चषक पटकावला. त्याचप्रमाणे या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये लोकनेते कै.विठ्ठलदादा खाडे आणि कै.सुनीताताई विठ्ठलराव खाडे यांच्या स्मरणार्थ 16 मॅन ऑफ द मॅच, कै.गीता आनंदा जाधव यांच्या समरणार्थ मॅन ऑफ द सिरीज, कै.शामराव नारायण व्हटकर आणि कै.हौसाबाई शामराव व्हटकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशी विविध पारितोषिके प्रदान करण्यात आली. 

   आर्यारवी एंटरटेनमेंटची ही प्रथमच कलाकार बॉक्स क्रिकेट लीग - २०२५ टूर्नामेंट यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी सौ माधुरी मांजरेकर (म.उप.विभाग संघटक-वडाळा विधानसभा-उबाठा), डॉ. साजिदा अत्तर (प्रसिद्ध समाजसेविका), श्री.मनीष पाथरे (जिल्हा संपर्क अध्यक्ष द. रत्नागिरी - मनविसे), खलील शिरगांवकर (प्रसिद्ध समाजसेवक), दिलीप कराड, भूषण शिर्के (प्रसिद्ध समाजसेवक), शैलेश काळे (प्रसिद्ध समाजसेवक), श्रीं नितीन जाधव (प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक), श्री कुशल धुरी (उपाध्यक्ष - मनविसे), आणि सो लक्ष्मी मनीष गुप्ता (प्रसिद्ध समाजसेविका) यांनी विशेष मेहनत घेतली. अशा तऱ्हेने खेळीमेळीच्या आणि कलावंतांच्या जोशपूर्ण वातावरणामध्ये आर्यारवी एंटरटेनमेंटची ही पहिली कलाकार बॉक्स क्रिकेट लीग उत्साहात संपन्न झाली.

Post a Comment

Previous Post Next Post