मासिक सभेची दांडी आली अंगलट ; कांडली ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र
अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कांडली ग्रामपंचायतीचे दोन सदस्य सतत गैरहजर राहत असल्याने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या दोन सदस्याना अपात्र ठरविल्याचा आदेश १६ मे रोजी निर्गमीत केल्याने १७ सदस्यीय असणारी कांडली ग्रामपंचायतीची सदस्य संख्या आता १५ वर आली आहे.
अचलपूर तालुक्यात कांडली ग्रामपंचायत सतत चर्चेत असतांना ग्रामपंचायत सदस्य गंगा धंडारे यांनी ग्रामपंचायत सदस्य रवि गोडबोले, मंगेश अतकरे, दिपक चव्हाण, संतोष घोरे, पवन परिवाले, रफिकुन्निसा कदिरोद्दीन या ६ सदस्यां विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४० ब अन्वये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी अंती दोन सदस्य पवन परिवाले व रफिकुन्निसा कदिरोद्दीन या दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामपंचातीच्या मासीक सभेला पवन परिवाले २० महिने ९ दिवस तर रफिकुन्निसा कदिरोद्दीन ८ महिने १२ दिवस सतत गैरहजर असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलमाचे ४० (२) अन्वये ६ महिण्यापेक्षा जास्त कालावधी अनुपस्थित असल्याने या दोन सदस्य अपात्र ठरविण्यात आले. तर ४ सदस्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा कमी असल्याने त्यांचे सदस्यावर घेतलेला आक्षेप निरंक ठरला.
Tags : #ग्रामपंचायत कार्यालय कांडली, #ग्रामपंचायत, #पंचायत समिती अचलपूर, #गावसहेली, #गावाकडचीबातमी, #india, #GavakadachiBatmi, #ग्रामविकासमंत्री, #Maharashtra, #ग्रामसेवक , #Achalpurnews, #भारत, #जिल्हा परिषद, #पंचायतविभाग, #पंचायतराज #अमरावती, #grampanchayatnews, #zpamaravatinews, #जिल्हाधिकारीअमरावती, #नरेंद्रमोदी, #देवेंद्रफडणवीस, #एकनाथशिंदे

