किनवट - शहराच्या एसव्हीएम रस्त्यावरील रेल्वे भुयारी पुलाचे काम गेल्या ४ म हिन्यांपासून सुरू आहे. एकूणच कामाची गती पाहाता पुलाचे काम येत्या २ महिन्यांत पूर्ण न झाल्यास भरपावसात नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.
एसव्हीएम रस्त्यावरील रेल्वेगेटवर रेल्वेगाड्यांच्या आवागमनामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. या रस्त्यावरून परिसरातील ६ गावच्या ग्राम स्थांसह स्थानिक नागरिक व शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. दिवसभरातून १० ते १५ वेळा रेल्वेगाड्यांच्या येण्या-जाण्यामुळे गेट बंद करण्यात येत असल्याने वाहतूक खोळंबत होती.
रेल्वे प्रशासनाने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षांत घेवून ४ महिन्यांपूर्वी रेल्वेगेट काम पूर्ण होईपर्यंत बंद केले. हे करीत असताना नागरिकांना पक्का पर्यायी रस्ता दिला नाही. यामुळे एसव्हीएम कॉलनी परिसरासह ६ गावच्या लोकांना सुभाषनगरच्या भुयारी पुलाखालून वळसा घालत किनवट शहरात ये-जा करावे लागत आहे. दुसरा एक पर्यायी रस्ता पैनगंगा नाल्यातून काढण्यात आला आहे.
हा पर्यायी रस्ता जोखीमीचा आणि धोकादायक आहे. रस्त्यावरील माती व मुरुमामुळे सध्या अधूनम धून पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसात या रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. पावसाळा तोंडावर असताना भुयारी मार्गाचे संथ गतीने होणारे काम पाहाता पैनगंगानदीला पाणी आल्यास हा रस्ता बंद होवून नागरिकांचे हाल होणार आहेत. पावसाळ्यात स्थानिक व परिसरातील ग्राम स्थांसह एसव्हीएम शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांना सुभाषनगर भुयारी मार्ग हाच एकमेव पर्याय असणार आहे.

