बदलापूर-उल्हास नदीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत भराव,संरक्षण भिंतीचे बांधकाम व नदीपात्रातील अतिक्रमण प्रकरणी उल्हास नदी बचाव समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.हेंद्रेपाडा येथील सत्संग विहार समितीने नदीपात्रातात अनधिकृतपणे भराव टाकण्याचे आणि संरक्षक भिंतीचे काम सुरु केले होते.या अतिक्रमणाची माहिती मिळताच उल्हास नदी बचाव समितीने महसूल,पोलिस आणि कुळगांव-बदलापूर नगरपरिषद प्रशासनासह संबधित अधिका-यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत कृती करत प्रशासनाने संबंधित काम थांबविले आणि आणि वापरात असलेल्या जेसीबी,पोकलेन मशिनरी सील केली होती.याप्रकरणी तहसीलदार मा.अमित पुरी यांनी ठोस कार्यवाही करत सत्संग विहार समितीवर १०कोटी १६लाख १७हजार १४१रुपयांचा दंड ठोठावला आहे.त्यांच्या या निर्णयाचे उल्हास नदी बचाव समितीने प्रशासनाचे मनःपूर्वक कौतुक करत मनस्वी आभार मानले आहेत.तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीया,प्रिंट मिडीया,युट्युब चॅनल व सर्व पत्रकार बंधु-भगिनी यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही उल्हास नदी बचाव समितीच्या वतीने धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात आले.
