इचलकरंजी(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
गुंफण या स्मरणिकेचे कोष्टी समाजाच्या हम्पीपिठाचे अधिपती श्री श्री श्री दयानंद पुरी महास्वामीजी यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाने केलेल्या आर्थिक मदतीने व श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांनी बांधलेल्या कैलासवासी कोठुजी कुंभारे यांच्या वस्तीगृह उद्घाटन प्रसंगात दिमाखदारपणे प्रकाशन झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्वामीजींनी कोष्टी समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा प्रसार, आर्थिक प्रगती व समाजाची एकता होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. प्रारंभी देवान समाजाच्या वतीने त्यांची पाद्यपूजा करण्यात आली.
या स्मरनिकेत महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी गेल्या पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कोष्टी समाज बांधवांच्या चौंडेश्वरी व बनशंकरी मंदिरांना, तसेच संघटनांना दिलेल्या भेटी. त्यांच्याशी साधलेला संवाद. तसेच 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व दयानंदपूरी स्वामींच्या वाढदिवसाचे निमित्ताने राज्यातील 75 चौंडेश्वरी मंदिरात स्वामीना दीर्घायुष्य लाभो यासाठी देवीला एकाच वेळी केलेला अभिषेक तसेच समाज संघटना बांधणीसाठी व उन्नतीसाठी आलेले विचारवंतांचे प्रबोधनपर लेख इ. गोष्टींचा उल्लेख आहे. त्यामुळे ही स्मरणिका समाज बांधवांना नक्कीच उपयोगी पडेल.
युवा संघटनेची पुनर्रचना करण्यात आली असून या समारंभात नवीन कार्याध्यक्ष म्हणून इचलकरंजी येथील युवा नेतृत्व जयेश बुगड यांना धुरा देण्यात आली. तसेच युवा उपाध्यक्ष विजय मुसळे ,महेश ढवळे हेमंत आमणे ,सचिन लोले प्रफ्फूल निवळ यांची निवड करून कांहीना , नियुक्तीपत्रे स्वामीजींच्या हस्ते देण्यात आली .या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, मॅनेजिंग ट्रस्टी अंकुशराव उकार्डे, निमंत्रित ट्रस्टी, राजेंद्र ढवळे, उपाध्यक्ष उदयराव बुगड, सल्लागार विश्वनाथ मुसळे, विठ्ठलराव डाके, महासचिव रामचंद्र निमणकर, सचिव मिलिंद कांबळे , महिला कार्याध्यक्ष स्मिता सातपुते, तसेच स्मिता बगड, संगीता धूत्रे , प्रीती बुगड, दीपा सातपुते, सुशीला फाटक, उज्वला कबाडे , एैश्वर्या सातपुते तसेच अखिल भारतीय कोष्टी कोष्टी फेडरेशनचे अध्यक्ष अरूणराव वरुडे, नारायण उंटवाले, दिलीप भंडारे ,शितल सातपुते विलासराव पाडळे, एस, एस अनिगोळ ,डी,एम कस्तुरे ,राजेंद्र चांगले, प्रमोद मुसळे, कुमार कबाडे मधुकर वरुटे ,आनंदा साखरे, उत्तम म्हेत्रे, राहुल सातपुते इत्यादी मान्यवर तसेच समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
