Chandur railway police | घरफोडीमध्ये आरोपी कडून सोने, चांदी व रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

 

Chandur railway police station, police station, amaravatinews, GavakadachiBatmi, Maharashtra, India, महाराष्ट्र पोलीस,

             Gavakadachi Batmi network 

 

 पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे - तीन घरफोडीमध्ये, आरोपी कडुन, सोने, चांदी व रोख रकमेसह एकूण ३,०६,८००/- रु मुद्देमाल जप्त


अमरावती, चांदूररेल्वे : दिनांक २१/०५/२०२४ पासून पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे येथील, अप नं ८५/२५ कलम ३०५.३३१(३) बि.एन.एस, या घरफोडीचे गुन्ह्यामधील आरोपी १) सिमा उर्फ हेमा परवीन शेख नसीम व तिचा पती २) शेख नसीम शेख सलीम दोघे राहणार सादीया नगर अमरावती ३) प्रफुल्ल सुधाकरराव पाठक रा. सराफा बाजार अमरावती हे अटकेत असतांना, त्यांचेकडे सखोल विचारपुस दरम्यान, १) सिमा उर्फ हेमा परवीन शेख २) शेख नसीम शेख सलीम यांनी चांदुर रेल्वे येथे अजून दोन घरफोडी केल्याचे कबुल केले.

   त्या बाबत शहानिशा केली असता अप नं ४१/२५ कलम ३०५,३३१(३) बि.एन.एस व ७८१/२४ कलम ३०५,३३१(३) बि.एन.एस अन्वये दाखल गुन्हयात घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हे दिनांक २१/०५/२०२४ पासुन २९/०५/२०२५ पर्यंत पि.सी.आर घेण्यात आला.

 तसेच पोलीस स्टेशन मधील वरील घरफोडीचे गुन्ह्यात सुध्दा आरोपी यांना अटक करण्यात आले आहे. चांदुर रेल्वे येथील तिनही घरफोडीमध्ये एकुण ८३ ग्रॅम सोने, ८३ ग्रॅम चांदी व रोख रकमेसह ३,०६,८००/- रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अमरावती ग्रामीण मधील इतर पोलीस स्टेशन मध्ये सुध्दा आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत ,उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग चांदुर रेल्वे प्रभार उपविभाग मोर्शी संतोष खांडेकर, पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शरद आहेर, पोउपनि सुयोग महापुरे, पोउपनि नंदलाल लिंगोट, पो.अं. प्रशांत ढोके, प्रदिप पाटिल यांनी केला आहे.


Tags -  #GavakadachiBatmi, #Maharashtra, #India, #amaravatinews, #police, #sdpo, #उपविभागीय_पोलिस_अधिकारी, #जिथेगाव, #तिथेआम्ही, #spAmaravati, #घरफोडी,  #chandurrailwaypolice, #Theft, #gold and silver, #Sub-Divisional_Police_Officer_chandurRailway, #District_Superintendent_of_Police, #SpecialPolice,#MaharashtraPolice, #District_Sessions_Court, #कोर्ट, #tehsil_Office_Chandur_Railway, #ग्रामपंचायत, #गाव, #महाराष्ट्र, #गृहमंत्री, #इंडियन_जनर्लिष्ट_असोसिएशन, भारत

Post a Comment

Previous Post Next Post