उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे राष्ट्रीय जेष्ठ आरोग्य आणि स्वस्थता व तंदुरुस्ती दिवस उत्साहात

 



चंद्रपूर,वरोरा :- दिनांक २८/०५/२०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील ग्रीन शेड मध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ आरोग्य आणि तंदुरुस्त दिन , जागतीक भूख दिन , अंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन, मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.

        आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . प्रफुल खुजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ प्रतीक दारुंडे वैद्यकीय अधिकारी, वंदना बरडे अधिसेविका , सतीश येडे आरोग्य सहायक उपस्थित होते.

दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दिप प्रज्वलन कार्यक्रमासाठी आलेल्या जेष्ठ नागरिक पार्वती विठ्ठल कोनाडे , डॉ प्रफुल्ल खूजे, डॉ दारूंडे, अधिसेविका वंदना विनोद बरडे,विजया नथ्थुजी डवरे ,मासिकं पाळी संदर्भात लाभार्थी, सतिश येडे यांनी केले.

प्रास्ताविक वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी केले त्यात त्यांनी २८ मे २०२५ ला असणार्या दिनानिमित्त प्रास्ताविक केले. 

प्रास्ताविकात माननीय अधिसेविका वंदना बरडे 

अधिसेविका यांनी राष्ट्रीय जेष्ठ आरोग्य आणि तंदुरुस्ती दिन, आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन,मासिक पाळी स्वच्छता दिन, जागतिक भुक दिन या दिवसांचे महत्त्व विषद केले.

   सोबत आभा कार्ड विषयक माहिती देण्यात आली. डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक यांनी आजच्या वास्तविक परिस्थितीवरून भुक दिनाची माहीती विशद करून वास्तविकता समजावून सांगितली.आणि त्यांवर उपाय योजना कळविल्या, सामाजिक बांधिलकी जपावी, असे नमूद केले.डॉ.प्रतिक दारुंडे यांनी जेष्ठ नागरिक यांच्या आरोग्या विषयीचे मार्गदर्शन केले.








प्रियांका दांडेकर अप.यांनी मासिकं पाळी स्वच्छता दिन विषयी माहिती दिली.

   सतिस येडे यांनी महीला आरोग्याविषयी माहीती दिली.सुत्र संचालन व आभारप्रदर्शन नेहा ईंदूरकर कौन्सिलर एन.सी.डी विभाग यांनी केले.कार्यक्रमाला वंदना विनोद बरडे, प्रियंका दांडेकर,कोमल टोंगे,साक्षी किन्नाके ,कुंदा मडावी कक्षसेविका यांनी मेहनत घेतली.भरपूर जेष्ठ नागरिक, महीला पुरुष व ईतर लाभार्थी यांनी लाभ घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post