विदर्भ संपादक मिलींद जामनिक
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गालगत आसरा फाट्या नजीक असलेल्या ताज इस्लामी हाँटेलवर जेवण करण्यासाठी आलेल्या ट्रक चालकाला तीन ते चार युवकांनी शिवीगाळ करीत काठीने डोक्यावर मारहाण करून लाथाबुक्क्या मारून जखमी केल्याची घटना 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली असून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपासाच्या गठानी भरून नेणारा ट्रक चालक शेख वसीम शेख लाल वय 28 रा. हनुमान नगर हैदरपुरा बाबा चौक, अमरावती हा जेवण करण्यासाठी ताज इस्लामी हाटेलात गेला असता आरोपी शेख आतिक शेख निजाम रा घरकुल याने व सोबत असलेल्या तीन अज्ञात युवकांनी
चालकाला कांदा, लिंबू आणण्यासाठी सांगितले, यावर चालकाने सांगितले की, मी ट्रक चालक आहो, जेवण करायला आलो आहे. एवढ्यावर चौघानी शिवीगाळ करीत काठीने डोक्यावर मारले तसेच कमरेचा बेल्ट काढून लाथाबुक्क्यानी मारहाण करून जखमी केले. अशा फिर्याद व मेडिकल रिपोर्ट वरून शहर पोलीस स्टेशनला कलम 118(1),115(2),351(2),352,3(5) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी हे करीत आहे.