स्वागत , सत्कार आणि नियुक्ती पुरस्कारांचा सन्मान डाहेलकर यांचा षटकार...!

 





मूर्तिजापूर - येथील साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल डाहेलकर यांना या दोन महिन्यात चार पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले. तर त्यानंतर अनेक ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल स्वागत सत्कार करण्यात आला. 

       विविध स़ंस्था , संघटना, मंडळांच्या कार्यक्रम आयोजनाचा सदैव हिरिरीने सहभागी होणारे डाहेलकर हे एक आदर्श व्यक्तिमत्व असुन त्यांच्या कडून युवकांनी प्रेरणा घेवून कार्य करावे असे उदगार आदर्श माजी सरपंच पुनाजी खंडारे भगोरा यांनी आई बाबा बहुउद्देशिय संस्थेव्दारे अनिल डाहेलकर यांच्या सत्कार प्रसंगी काढले. लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदी डाहेलकर यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती.

 लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख निबेंकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांना नियुक्ती आणि ओळख पत्र वऱ्हाडी साहित्यिक पुष्पराज गावंडे आणि ईतर मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले. डाहेलकरांना घवघवीत यश प्रदान करणाऱ्या या दोन महिन्यात राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रिक साधत चार पुरस्कार मिळाले आहेत आणि वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती पर्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदर्श समाज सेवक पुरस्कार व महाराष्ट्र ग्रामिण न्युज मलकापुर चा महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2025 असे दोन जाहिर झाले आहे असून अनिल यांनी पुरस्कारांचा षटकार ही त्यांनी हाणला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post