Maharashtra State Human Rights Commission
राज्य मानवी हक्क आयोग न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचे संकेत
विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
अमरावती, Achalpurnews, अचलपूर : अचलपूर नगरपालिका हद्दीत दलित वस्ती प्रावधानित विकास निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, संबंधित प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई न्यायालयाने सरकारला कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते किशोर मोहोड यांनी २०१८-२०१९ या आर्थिक वर्षासाठी दलित वस्ती विकास योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ४७ कोटी ४८ लाख ११ हजार ८१३ रुपयांच्या निधीच्या चुकीच्या वापराबाबत आवाज उठवला होता.
यासंदर्भात त्यांनी विविध पुरावे आणि कागदपत्रांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा निधी अन्य कामांसाठी वापरण्यात आला आणि त्याचा लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहोचला नाही. याप्रकरणी प्रामुख्याने नगरपालिका प्रशासन, यांच्यावर दोष नोंदवण्यात आला आहे.
न्यायालयाने देखील आपल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, दलित वस्ती योजनेचा निधी इतर विकासकामांसाठी वापरणे हे अन्यायकारक असून ते थेट घटनाविरोधी आहे.
"न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी.
तसेच दलित वस्ती योजनेचा वापरलेला निधी परत मिळवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आदेशित केले आहे. तसेच, भविष्यात या प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा कार्यरत ठेवण्यावर भर देण्याचा सल्लादेखील न्यायालयाने दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव कार्यालयात १४ मे २०२५ रोजी ठसा पडलेली नोंद आहे. या आदेशामुळे अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये पारदर्शकता येण्याची आशा असून, दोषींवर तातडीने कार्यवाही झाली नाही तर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Tags : #Maharashtra State Human Rights Commission,#achalpurnews, #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #villagenews, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #पर्यावरण #Konkan, #प्रदुषण, #स्वच्छभारत, #सुंदरभारत, #लोकसेवा , #हिंदुस्थान, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #परतवाडा, #socialmedia, #ElectronicMedia, #PrintMedia, #Newspaper, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #bharatnews, #newsbharat, #hindustan, #hindustannews, #सहेलीगाव, #गाव, #सहेली, #मानवाधिकार, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #ट्युडेन्यूज, #newshindi, #marathibatmi, #lokeva, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #ChiefMinister, #Achalpurnews , #ucp_Voice_news, #ucp, ,#PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, #environment , #नगरपरिषद , #अचलपूरनगरपालिका, #अचलपूरबातमी, GavakadachiBatmi.com.