कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
कल्याण आणि आजुबाजूच्या तालुक्यातील तरुणांना भविष्यात सक्षम बनविण्यासाठी एमबीए अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी अचिव्हर्स कॉलेजला एआयसीटीईची मान्यता मिळाली आहे. कल्याणमधील अचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अण्ड मॅनेजमेंटचे संस्थापक प्राचार्य डॉ.सीए महेष भिवंडीकर आणि उपप्राचार्या,एमबीए प्रोग्राम कोऑर्डिनेटर कु. सोफिया डिसुझा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्षक तत्त्वांनुसार, मास्टर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेषन एमबीए अभ्यासक्रमाला अधिकृत मान्यता "ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेषन" कडून मिळालेली आहे.
उच्च दर्जाचे उदयोग केंद्रीत आणि जागतिक स्तरावर व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी कॉलेज तयार झाले आहे. तसेच देवू केलेल्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत अचिव्हर्स कॉलेजचे उद्दिष्ट कल्याण आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये पदव्युत्तर व्यवसाय षिक्षणाचे स्वरुप बदलण्याचे असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवान व्यवसाय जगात नेतृत्व करण्यास, नाविन्यपुर्ण होण्यास आणि यषस्वी होण्यास सक्षम बनविणाऱ्या व्यावसायिक पदवी कार्यक्रमात प्रवेष मिळेल.एमबीए अभ्यासक्रमाची सुरुवात ही अचिव्हर्स कॉलेजची शैक्षणिक उत्कृष्टता, नाविन्यपुर्णता आणि समावेषक प्रषिक्षणासाठीची वचनबध्दता प्रतिबिंबित करते. जेणेकरुन कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि इतर सभोवतालच्या भागातील इच्छुक विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल.