आरोपी विरुद्ध ग्रामीण पो स्टे ला ऍक्रासिटीचा गुन्हा दाखल
विदर्भ संपादक मिलींद जामनिक
मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात बिएसएफ मध्ये कॅन्सटेबल असलेल्या मित्राच्या 26 वर्षीय पत्नीचा वारंवार पाठलाग करून मानसिक त्रास देवून विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून 33 वर्षीय आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला 29 एप्रिल रोजी विनयभांगासह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 26 वर्षीय महिला ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करते, पती हे बीएसएफमध्ये कांस्टेबल म्हणून जम्मू कश्मीरला कर्तव्यावर आहे. त्यांच्या मित्र नागेश केशव खोंड वय 33 हा पतीचा लहानपणीचा मित्र तसेच पतीने ओळख करून दिल्याने घरी आला असता बोलत असे, चार वर्षानंतर त्याच्या वागण्यात बदल दिसून आला. तो कोणी नसल्याचे पाहून पाठलाग करायचा.ही सर्व हकीकत पतीने 28 एप्रिल रोजी पत्नीला विश्वासात घेवून विचारली असता शेवटी 29 एप्रिल रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी नागेश खोंड विरुद्ध तक्रार दिल्यावरून
बीएनएस कलम.78.79. सहकलम. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती. अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989.
3(1) (w) 3.(1) (w) (i) 3 (1) (w) (ii) 3 (2) (va) प्रमाणे
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक मनीषा सामटकर हे करीत आहेत.