गावाकडची बातमी | पशू वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी !

 

पाळीव प्राणी, पशुपालक

जिल्ह्याच्या ठिकाणाहून करतात अपडाउन !

ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त !


अनिल बंगाळे, गावाकडची बातमी


नांदेड : जिल्ह्यातील किनवट हा आतिदुर्गम व आदिवासी भाग आहे. आदिवासीच्या जीवनात उत्कर्ष यावा व त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर सुधारावा व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राज्य शासनाने तालुक्यातील बहुतांश गावात पशुवैद्यकीय दवाखाने उभारली आहेत व राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळया योजना राबविल्या जात आहेत. 

    परंतु आदिवासीचा सामाजिक व आर्थिक स्तर सुधारणे सोडाच पण येथील काही पशुवैद्यकीय दवाखाने सोडले तर इतर सर्व पशु वैद्यकीय दवाखाने हि नावालाच आहेत. 

   कारण येथील बहुतांश कर्मचारी हे जिल्हयाच्या ठिकाणाहून महिन्यातून अपवादात्मक 4 ते 5 दिवस येतात व दवाखान्यातील सर्व भार हा येथील परिचर वर्ग सांभाळतो. 

   जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्ग हा परिचारांना फोनवरून उपचार कोणते करावयाचे हे सांगतात व त्यानुसार नाईलाजाने परिचर वर्ग हा त्यांच्या दबावाला बळी पडून पशुंवर उपचार करीत आहेत.

अशे चुकीचे उपचार केल्यामुळे तालुक्यातील बरेच पशू हे मरण पावले आहेत आणि येथील कर्मचाऱ्यांनी हि प्रकरणे केव्हाच रफादफा केली आहेत. उपचार करण्याचे अधिकार शासनाने परीचरांना दिलेले आहेत काय असा सवाल पशुपालक विचारत आहेत. 

   हे सर्व प्रकार सर्रास घडत असतांना बरिष्ठ अधिकाऱ्यांशी हया कर्मचाऱ्यांचे साटेलोटे आहे की काय व दर महिन्याला काही रोख रक्कम देवून त्यांना कर्तव्य बजवायल हे वरीष्ठ अधिकारी सुट देत आहेत अशी चर्चा पशुपालकांत ऐकावयास मिळत आहे.

संबंधित पशुपालकांना कर्मचारी हे कर्तव्यावर नसल्यामुळे प्रायव्हेट कर्मचरी बोलावून अव्वाच्या सव्वा फि घेवून आपल्या पशुंवर उपचार करून घेत आहेत.

   त्यामुळे पशुपालक हे आता आखरी घटका मोजत आहेत, काही पशु वैद्यकीय दवाखान्यात तर प्रायव्हेट प्रक्ट्रीशनर ठेवून तेथील कर्मचारी त्यांना महिना 5-10 हजार रू. देवून मुख्यालयी न राहता जिल्हयाच्या ठिकाणी राहून मुद्यामहून पशुपालकांची गैरसाय करीत आहेत. 

   तेव्हा संबंधित दोषी कर्मचाऱ्यांची सखोल व कायदेशिर चौकशी करून किनवट येथील अतिदुर्गम व आदिवासी बहुल भागातील पशुपालकांना न्याय द्यावा, अन्यथा तालुक्यातील सर्व पशुपालक एक जन आंदोलन करून आपल्या कार्यालयाच्या प्रांगणात येत्या काही दिवसांत प्राणांतिक उपोषण करतील व वेळप्रसंगी आत्मदहन सुध्दा करतील याची प्रशासनाने दखल घ्यावी. 

पुढील येत्या काळात पशुपालकांत व पशुंना काही अनर्थ घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल. संबंधित अर्जाची प्रत हि व्यक्तिशः राज्याच्या दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे (मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात येईल व या संदर्भात आपण जर काही कार्यवाही नाही केली तर न्याय मागण्यात येईल. याची नोंद घ्यावी व सदरील पशु वैद्यकीय दवाखाने हे सकाळ व सायंकाळी त्यांच्या नियोजित वेळेत चालू राहतील याची दक्षता घ्यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी प्रा.विजय खुपसे, गोपीनाथ बुलबले, रघुनाथ जुमडे,माजी सरपंच माळ बोरगाव, निखिल वाघमारे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उत्तम पोटे माळ बोरगाव उपस्थित होते..


Tags :  #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #पर्यावरण #Konkan, #प्रदुषण, #स्वच्छभारत, #सुंदरभारत, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #ChiefMinister, #PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, #environment , GavakadachiBatmi.com.  

https://www.youtube.com/@gavakadachibatmi

Post a Comment

Previous Post Next Post