किनवट ,अनिल बंगाळे : नांदेड जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. बीरगे यांच्या हस्ते किनवट तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी प्रभारी पदाचे नियुक्तीपत्र अनिलकुमार महामुने यांना देण्यात आले. या नियुक्तीद्वारे आदिवासी आणि अतिदुर्गम भागाची सखोल जाण असलेल्या, बहुजन समाजातील होतकरू व तडफदार शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला आहे.
अनिलकुमार महामुने हे शिक्षणक्षेत्रातील अनुभवसंपन्न शिक्षण विस्तार अधिकारी असून त्यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागात कार्य करताना अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यशैलीमध्ये नवकल्पना, विद्यार्थी केंद्रित शिक्षण आणि स्थानिक गरजेनुसार शैक्षणिक धोरणांचा समावेश करण्यात आला आहे.
किनवट सारख्या आदिवासी व सीमाभागातील तालुक्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी हे नेतृत्व निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे स्थानिक शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलांची नांदी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Tags: #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #पर्यावरण #Konkan, #प्रदुषण, #स्वच्छभारत, #सुंदरभारत, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #ChiefMinister, #PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, #environment , GavakadachiBatmi.com.