मांडवी परिसरातील खंबाळा, दुर्गापेठ येथे अवैध रेती साठे महसूल विभागाचा काना डोळा


घरकुल योजना लाभार्थी गावाकडची बातमी

                    छायाचित्र-लक्ष्मीकांत मुंडे 


रेती माफिया कडून रेतीची कृत्रिम टंचाई करून आठ हजार रुपये दराने खुल्ली विक्री 


               विशेष प्रतिनिधी,अनिल बंगाळे 

 राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याची घोषणा केली असली तरी किनवट तालुक्यात अद्यापही या योजनेची अंमलबजावणी झाली नसून मांडवी परिसरातील, खंबाळा व दुर्गापेठ येथे आठ रेती तस्करांनी गावाच्या अवतीभोवती अज्ञात स्थळी शेकडो ब्रास रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध साठा केला असून खंबाळ्याचे तलाठी दुर्लक्ष करत असल्याने खुली विक्री सुरू आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल लाभार्थ्यासाठी पाच ब्रास रेती मोफत देण्याचे सांगितले गौण खानीकर्म विभागाने अंमलबजावणी करावी त्यासाठी घरकुल लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्या लाभार्थ्यांना रेती आणण्याची घरपोच पावती 20 तारखेपर्यंत देण्याचे ठरविण्यात आले. परंतु आज मे महिना संपत आला असून किनवट तहसीलदार यांनी अद्यापही एकाही घरकुल लाभार्थ्याला रेती उपलब्ध करून दिली नाही. या मुळे अवैध रेती वाळू साठा करणाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होतो आहे.याचाच फायदा घेऊन सक्रूनाईक तांडा येथील 2, खंबाळा येथील 4, उमरी बाजार येथील 1, तसेच मथुरा टेंभी तांडा 4 या 11 रेती तस्करांनी गोलापेठ, संक्रू नाईक तांडा, खंबाळा, मथुरा टेंभी तांडा या गावाच्या अवतीभोवती हजारो ब्रास रेतीचे वेगवेगळ्या ठिकाणी आज्ञास्थळी अवैध रेतीसाठे करून ठेवले आहे. यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने पैनगंगा नदीला पाणी वाढल्याने नदीतून रेती काढणे अवघड झाले आहे. याचाच फायदा घेऊन या रेती तस्करांनी तब्बल दहा हजार रुपये प्रमाणे एक ट्रॅक्टर रेती विकण्याचा धडाका सुरू केला आहे. या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे साठे असल्याबाबत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय गौणखणी कर्म विभाग, तहसीलदार किनवट, तसेच संबंधित तलाठी यांना माहिती व पूर्वकल्पना देऊन ही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे संबंधित महसूल विभागाच्या तलाठ्याच्या संगणमतानेच या पैनगंगा नदीच्या भागातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर अवैध रेतीचे साठे करण्यात आले असून या रेती तस्करांना रान मोकळे करून दिले आहे. तेव्हा हा अवैध रेतीसाठा जप्त करून रेती तस्करांना सहकार्य करणाऱ्या तलाठ्यावर व महसूल अधिकारी यांच्या वर योग्य कारवाई करावी तसेच हा जप्त केलेला रेतीसाठा घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post