राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड !!


Amaravatinews



 कृषी पत्रकारिता च्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या सारखा संवेदनशील विषय, प्रधानमंत्री पिक विमा योजना, अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान अशा विविध शेती विषयक प्रश्नांसंदर्भात शासन व्यवस्थेचे लक्ष वेधण्यासाठी कार्यरत असलेले आयबीएन लोकमतचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी  संजय सूर्यभानजी शेंडे यांना सन 2025 चा अत्यंत मानाचा व मानांकित राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न उत्कृष्ट कृषी पत्रकारिता पुरस्कार प्रदान

दि. 25 मे 2025 रोजी सर्किट हाऊस, अमरावती येथे एका छोटेखानी कार्यक्रमात कृषी पत्रकार संजय शेंडे यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती च्या वतीने  प्रकाश साबळे, डॉ. दिलीप काळे, भैय्यासाहेब निचळ, राहुल तायडे, ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते राजीव गांधी कृषिरत्न उत्कृष्ट कृषी पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आयबीएन लोकमतच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील विषयावर शेतकरी कुटुंबांना मदत व्हावी यासाठी स्पष्ट भूमिका मांडणारे संजय शेंडे हे निर्भीड पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे मत राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी व्यक्त केले.

 संजय शेंडे यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया कृषी पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Tags  :  #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #पर्यावरण #Konkan, #प्रदुषण, #स्वच्छभारत, #सुंदरभारत, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #ChiefMinister, #PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, #environment ,  #सामाजिक , #सोशलमिडीया, GavakadachiBatmi.com. #journalist 


Post a Comment

Previous Post Next Post