घरकुल लाभधारकासह नागरिकांची वाळूसाठी लूट
पावसाळ्याला एक महिना शिल्लक असल्याने पैनगंगा नदी पात्रावरील नऊही वाळू घाट हरास करण्याची मागणी
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेली पैनगंगा नदी असूनही या नदीपात्रातील वाळूचा फायदा स्थानिक नागरिकांना होत नसल्याने सात हजारावर घरकुलधारकासह घराचे बांधकाम करणारे नागरिक वाळूपाई त्रस्त झाले असून नाईलाजास्तव वीस हजार रुपये बरासने पिवळी वाळू घेऊन बांधकाम करण्याची पाळी आल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहायक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला यांनी तात्काळ पैनगंगा नदी पात्रातील नऊ वाळू घाट हरास करून नागरिकांना वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रागाच्या भरात नागरिकांतून होत आहे.
छायाचित्र ईलीयास बावानी माहूरमाहूर तालुक्यातील नागरिकांच्या सार्वजनिक फायद्याच्या विषयाकडे नेहमीच कानाडोळा होत आलेला आहे एकीकडे शासन हजारो घरकुल मंजूर करते तसेच पाच बरास वाळू मोफत देण्याचे आदेश देते परंतु येथील राजकारणी आणि अधिकारी हे गोरगरिबांचा विचार न करता मलाईदार विषय हाताळण्याकडे लक्ष देतात आणि पदाधिकारी त्यांना पाठिंबा देतात हे सर्वश्रुत आहे पैनगंगा नदी पात्रात प्रचंड वाळू असून दरवर्षी लाखो ब्रास वाळू वाहून जाते परंतु याचा फायदा येथील नागरिकांना होत नसल्याने नदी उसाला कोरड घशाला हे मन शंभर टक्के तंतोतंत माहूर तालुक्यात खरी ठरत आहे.
पंचायत समिती कार्यालयाकडून जवळपास 7 हजार घरकुल मंजूर करण्यात आले असून माहूर शहरातही दीड ते दोन हजार घरकुले वाळूच्या प्रतीक्षात अर्धवट बांधकाम करून उभी आहेत पावसाळा एका महिन्यावर आला असताना हजारो घरकुलधारक या पावसाळ्यात कुठे राहतील याचा अंदाज न लावलेला बरा कोट्यावधी रुपये खर्चून शासन घरकुल मंजूर करत असून नागरिक जप्तीची पाच हजार रुपये ब्रास ने वाळू घेऊन कसेबसे घरकुलाचे काम पूर्ण करत होते त्या जप्तीची वाळूही बंद झाल्याने तसेच तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी वाळूघाटावर करडी नजर ठेवून असल्याने नागरिकांना वाळू मिळणे दुरापस्त झाल्याने त्यांना लाल वाळू वीस हजार रुपये ब्रास णे हात पाय जोडून घ्यावी लागत असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला तहसीलदार किशोर यादव यांनी तात्काळ वाळू घाट हरास करून अनेक वाळू घाटाच्या वर जप्त केलेली वाळू तात्काळ नागरिकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.