Agriculture | खरीपाच्या अनुषंगाने कृषि विभागाचे महिला गटांना मागदर्शन

 



 

अमरावती, पवन पाटणकर :  तालुक्यात खरीप पुर्व हंगामाच्या नियोजनासाठी कृषि विभाग ग्रामस्तरावर  विविध उपक्रम राबवित आहे.यामध्ये शेतकऱ्यांसाठी खरीप पुर्व बैठका घेऊन मार्गदर्शन, प्रशिक्षण,आणि शेतीशी निगडित आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहे.शेतीत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असतो.त्यांचा शेतीत लागवडी पासून ते काढणी पर्यंत व काढणीपश्चात सहभाग पाहाता त्यांना आवश्यक ते तांत्रिक माहिती मिळणे आवश्यक व महत्त्वाचे आहे.

    त्यासाठीच महिला बचत गटाच्या माध्यमातून सभा घेऊन त्यांना कृषि तंत्रज्ञान,वित्तीय बियाणे आणि खतांचे नियोजन,लागवड पद्धती,पाणी व्यवस्थापन,कीटक आणि रोगांवर नियंत्रण,अशा विविध बाबींची माहिती होण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा येथे कृषि साहाय्यक मारोती जाधव यांनी गावातील महिला बचतगटांची सभा घेऊन पिक लागवडी बरोबरच इतर योजनेची माहिती दिली.

   यामध्ये बियाणे उगवण तपासणी, बिजप्रक्रिया, जलतारा,फळबाग लागवड,ॲग्रीस्टॅक,पि एम किसान या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.आणि सर्व उपस्थित महिलांना पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता  व बिजप्रक्रिया करूनच लागवड करावी असे आवाहन केले.

यावेळी राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.


 

Post a Comment

Previous Post Next Post