Amaravati | मोतीनगर येथे पक्षांसाठी पाणीपत्र वाटप

 

Amaravatinews


अमरावती : उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानाचा मानवी जीवनावर जसा परिणाम होतो तसा पशुपक्ष्यांना सुद्धा उष्णतेचा खूप त्रास सहन करावा लागतो.आज माणसाला पिण्याचे पाणी कुठेही उपलब्ध होऊ शकते परंतु जल तळे,तलाव,ईत्यादी कोरडे पडल्याने पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध होत नाही त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते पाण्याअभावी कित्येकांचे जीव सुद्धा जातात कित्येक पक्षी शहरांकडे धाव घेतात.

        शहरात येणाऱ्या पक्ष्याची पाण्यासाठी तारांबळ उडू नये,व त्यांना पाणी उपलब्ध व्हावे याकरिता स्थानिक मोतीनगरातील राजेंद्र माहुरे मित्रमंडळ व श्री संत गजानन महाराज सेवाभावी संस्था सदस्यांनी मोतीबाग व किरण नगर परिसरात पक्षांसाठी पाणीपत्र वाटप करून झाडांना बांधले व त्यात पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी विरेंद्र गलफट,प्रवीण शेंडे,उदय चव्हाण,सुनील देशमुख,बाळासाहेब ठवळी,सुनील गुल्हाणे,समीर लाडविकर,पप्पू आवारे,रामा कडू,पप्पू ठाकूर,बाळासाहेब पुरी,श्याम वानखडे,सुनील आसलकर,गुड्डू मालोकर,बाळू शेंडे,अर्णव आसलकर,राजू बांबल,बब्बल ठाकूर,मनीषा माहुरे,शारदा गोगटे,ई उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post