माहूरतालुक्यात कुपटी येथे मेघगर्जनेसह वादळी पाऊस
श्रीक्षेत्र माहूर : दि.४ मे रोजी रविवारी दिवसभर कडाक्याची उन्ह असता अचानक सायंकाळी ६. वाजेपासून हवामानात बदल होवून वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. पाहता पाहता अचानक या वादळ वाऱ्यांनी शुद्रारुप धारण केले व सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जना, विजाचा कडकडाटासह ६ वाजता हलका, कुठे मध्यम पाऊस तर कुपटी गावात गाराचा वर्षाव झाला. पाऊसाला सुरुवात झाली. या दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होवु बत्तीगुल मुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच हल्ली जोरात लग्न समारंभ कार्य गावोगावी सुरु असता त्यात जमलेल्या वऱ्हाडी पाहुण्याची कार्य उरकण्यास व जेवण्यासह स्वगावी परतण्यास तारांबळ झाली. तसेच जे कुणी प्रवाशी प्रवास करीत होते त्यांना त्या त्या परीस्थितीनुसार आसरा घेण्याची वेळ आली असून प्रवाशांच्या तारांबळी सह जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहावयात मिळाले. सध्या कुपटी परिसरात मोठ्या प्रमाणात तीळ, मूग, ज्वारी,लागवड असून कापणीला आलेल्या तीळ मूग,पडल्याचे व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,झाडांचीही पडझड, तर कुठे वाळवणीला ठेवलेले साहित्य, कुठे टिन पत्रे उडाल्याचे पाहावयास मिळाले.
कुपटी परिसरात गारपीट
माहूर तालुक्यातील कुपटी येथे व परिसरातीत दि. ४ मे रोजी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. माहूर तालुक्यात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुपटी येथे वादळ वाऱ्याचा जोर कायम होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने विद्युत ताराही तुटल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा रात्रभर खंडीत होता. वादळी वाऱ्यामुळे आंबा, तसेच इतर फळवर्गीय पिकांचे मोठे नुकसान होऊन फळबागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. तर कापणीला आलेले उन्हाळी तीळ, मुग, व ज्वारी ,पिकाचेही नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तरी मका पिक काढणीला आले आहे तसेच भाजीपाला व फळपिकांचे काही अंशी नुकसान पाहावयास मिळत आहे.