परतवाडा/ संतोष भालेराव -: अचलपूर तालुक्यातील उपातखेडा ग्रामपंचायत हद्दीतील वनपरिक्षेत्र प्रादेशिक परतवाडा यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जैवविविधता उद्यानाचे भयानक वास्तव आता समोर यायला लागले आहे सदर प्रतिनिधी प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता लाखों रुपयांच्या निधीचा विनियोग वाया गेल्याचे दिसून येते आहे.
सर्व प्रकारच्या वृक्षांची अगदी जाणून बुजून विल्हेवाट लावल्या सारखी परिस्थिती आहे प्रतीनीधी स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक यांच्या कार्यालयात अधिकारी यांना या बाबतीत विचारणा करण्यासाठी गेले असता अधिकारी तेथे आढळून आले नाहीत तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की साहेब आज येणार नाहीत तसेच वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण यांच्या कार्यालयावर ११ वाजताच्या सुमारास कुलुप टांगलेले दिसुन आले.
तेथील कर्मचारीही आढळून आले नाहीत या जैवविविधता उद्यानाचे काम नेमके कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येते हे सुद्धा तपासण्याची गरज आहे.
कारणं की आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश खानझोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार साडेतीन कोटी रुपयांची उधळपट्टी करून शासकीय निधीतून अपहार केल्याप्रकरणी चौकशी समिती नेमुन सखोलपणे चौकशी करण्याबाबत संबंधित विभागाकडे मागणी करणार आहे अशी माहिती दिली आहे..