येणाऱ्या दिवसांत एनजीओंना मोठ्या संधी - सचीन धूमाळ



 ऑनलाईन कार्यशाळेला तालुक्यासह देशभरातील असंख्य एनजीओंचा उस्फुर्त प्रतिसाद





मूर्तिजापूर - तालुक्यासह, राज्यात आणि देशात वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य एनजीओ आपआपल्या पद्धतीने कार्यरत आहेत. कामाच्या बाबतीत शासन स्तरावरून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने निराश झालेल्या एनजीओंना येणाऱ्या दिवासांत विविध उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन आर बी डिजीटलचे संचालक सचीन धुमाळ यांनी केले आहे.


        विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशन व आर बी डिजीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या कोहिनूर कॉन्टिनेन्टल या हॉटेल मध्ये दिनांक २४ एप्रिल रोजी आयोजीत " एनजीओचा खडतर प्रवास " या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संस्था प्रोजेक्ट मिळवून देण्याच्या प्रलोभनाला बळी पडून आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकणारे क्षेत्र असून स्वयंसेवी संस्थांच्या अशा आर्थिक फसवणुकीवर टाच आणत गेली पंधरा ते विस वर्षापासून आमची आर बी डिजीटल ही एनजीओंच्या सेवेत दाखल असून राज्य व केंद्र सरकारच्या विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसांत एनजीओंना मोठ्या संधी उपलब्ध होतील असे श्री धुमाळ यांनी सांगितले आहे.


           या ऑनलाईन कार्यशाळेला विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलींद जामनिक जयदेव भाई ठक्कर, रामकुमार, योगेश मंडगे, रामचंद्र कवडे, सचीन नवगिरे,उषा वनारे, विवेक नगरे, अमोल पोटदुखे यांच्यासह देशाच्या विविध राज्यातील प्रतिनिधी व आदी मान्यवर उपस्थीत होते.

प्रस्ताविक कल्याण कुसूमडे यांनी सुत्रसंचालन उत्तम धुमाळ तर आभार मिलींद जामनिक यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post