सोपानराव सोळंके यांची जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती...
संगीता बारेला यांची प्रदेश महासचिव पदी नियुक्ती.....
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष राम साहेब चव्हाण यांच्या बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगांव जामोद येथे दिनांक 7 एप्रिलच्या दौऱ्या निमित्त जळगाव जामोद येथील रेस्ट हाऊसला जिल्हा मीटिंग बोलविण्यात होती.बैठकी मध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून समाजावर विविध प्रकारे अन्याय केले जात आहे.
या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आदिवासी समाज बांधव एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामसाहेब चव्हाण यांनी बोलतांना सांगितले यावेळी जिल्हा अध्यक्ष म्हणून सोपान सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली आपल्या भाषनातून बोलतांना म्हणाले की आदिवासी समाज रानोमाळ राहून आपली उपजीविका करतात. अशा परिस्थितीत त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आदिवासी समाजाने एकसंघ राहून संकटांचा सामना करावा असे आवाहन त्यांनी केले.
शेषराव कोवे राज्ये सह सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विलास दादा वाघमारे नंदनी टारपे महिला प्रदेशाध्यक्ष यांनी आपले मत मांडले. संगिता बारेला यांची प्रदेश कार्यकारणी मध्ये प्रदेश महासचिव म्हूणन नियुक्ती करण्यात आली.
तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सुखदेव राव डाबेराव यांनी सुद्धा समाजाला मार्गदर्शन केले कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र कमिटीचे उखरडा सोळंके, मनीष तडवी, गजनान डाबेराव,कलीम तडवी,विलास घट्टे,अरूण चव्हाण,बाळूभाऊ डाबेराव,अंजुर पवार,रेहान केदार,लालासिंग अहिर्या, भरतसिंग राठोड, लक्ष्मण राठोड,विनेश बारेला तथा बहुसंख्य आदिवासी समाज बंधू आणि भगिनीं उपस्थित होते....