नर्सिंग क्षेत्रातील व्यक्तींनी टि. एन.ए.आय चे मेंबर होण्याचे आवाहन वंदना बरडे अधिसेविका



 नर्सिंग क्षेत्रातील व्यक्तींनी टि. एन.ए.आय चे मेंबर होण्याचे आवाहन वंदना बरडे अधिसेविका उपजिल्हा रूग्णालय वरोरा 

 


 चंद्रपूर: वरोरा दिनांक ५ एप्रिल २०२५ ला नर्सिंग क्षेत्रातिल उच्च व नामांकित असोसिएशनची विदर्भ विभागाची मिटींग झाली.त्यात वंदना विनोद बरडे अधीसेविका ह्या पण आमंत्रित होत्या.दिनांक ४ एप्रिल २०२५ ला टी.एन.ए.आय. च्या विदर्भ विभागाच्या निवडणूक झाल्या.त्यात वंदना विनोद बरडे अधीसेवीका ह्या निवडणूक साठी रिंगणात होत्या.निवडून आलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले.तसेच टी.एन.ए.आय.त्या संदर्भात कोण कोणत्या ठिकाणी कसे काम चालते.मेंबर झाल्याचे काय फायदे आहेत.हे समजावून सांगितले.त्या मध्ये नर्सिंग क्षेत्रातिल व्यक्तींनी जर रजिस्ट्रेशन केले तर १० लाखांचा अपघाती विमा आहे.जर काही क्रीटिकल आजार झाले तर त्यासाठी २ लाखांचा विमा आहे.



तसेच नर्सिंग क्षेत्रातिल उच्च शिक्षणासाठी व परदेशात शिक्षणासाठी पुर्ण मोफत शिक्षणाची सोय आहे.त्यासाठि टी.एन.ए आय चे आजिवन मेंबर्स होणे आवश्यक आहे.आपल्या बरोबर दुसऱ्या व्यक्तिंना फायदा व्हावा म्हणून वंदना यांनी आव्हान केले आहे की आपणं त्वरित आजीवन नोंदणी करावी.त्यामानाने नाममात्र शुल्क आकारले जाते.तसेच निवडणूक झाली तर आपल्या मेंबर झाल्यावर निवडणूक लढण्याचा अधिकार मिळतो.म्हणुन सर्वांनी आपले टि.एन.ए. आय चे रजिस्ट्रेशन करावे असं म्हणता आव्हान केले जात आहे.आणि त्याचा प्रचार व प्रसार करावा व इतरांचेही या माध्यमातून भले करावेत.या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट दिपकमल व्यास नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट वेस्ट विभाग, रत्ना देवरे सेक्रेटरी टी एन ए आय एम एस वत्सला दिनाकरण अशिस्टन्ट सेक्रेटरी टि एन ए आय हेडक्वार्टर दिल्ली, सुचित्रा दळवी सोसीयल वेल्फेअर चेअरपर्स‌‌‌, राजाभाऊ राठोड अध्यक्ष टि एन ए आय एम एस बी, श्वेता दाभोलकर सेक्रेटरी टी एन ए आय एम एस बी,साईसागर श्रीसागर जाँईट सेक्रेटरी टी एन ए आय एम एस बी हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन लता मंगेशकर हाॅस्पीटल मध्ये डॉ. आम्रपाली व त्यांच्या टिमने केलें होतें. हा कार्यक्रम २०० मेंबर च्या उपस्थितित उत्साहात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post