रामजीत गुप्ता यांना संजीवनी फाऊंडेशनचा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

 

उल्हासनगर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)समाजाचे आपण काही देणे लागतो,निस्वार्थीपणे समाजसेवा करणे हे काही व्यक्तींच्या अंगवळणीच पडलेले असते,त्यातीलच एक सामाजिक क्षेत्रातील एक उज्वल व्यक्तीमत्व म्हणजे समाजसेवक रामजित गुप्ता.रामजीत गुप्ता हे अॅन्टीपायरसी सेल मुंबईचे मुख्य तपाशी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.आपली नोकरी संभाळून रांजलेल्या दिन-दुबळ्या गरीब गरजु व्यक्तींना मदत करणे व त्यांचे जीवन सुखमय करणे हे काम रामजीतजी नेहमीच करत असतात.ब-याच सामाजिक सामाजिक संस्थांना त्यांनी अर्थसहाय्य व वस्तू रूपाने मदत केलेली आहे.याच त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य या संस्थेने घेतली.व त्यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव हा राज्यस्तरिय पुरस्कार जाहिर केले आहे.नाशिक येथे भव्य दिव्य समारंभात माननीय नामदार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.या आधीही रामजीत(जीतु)गुप्ता यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कित्येक पुरस्कार मिळालेले आहेत.'जनसेवा हीच ईश्वर सेवा'हेच जितु सर यांचे ब्रिद वाक्य आहे.जनसामान्यांचा जनसेवक म्हणून ते प्रचलित आहेत.रामजीत(जितु)गुप्ता यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post