जिल्हा प्रतिनिधी- पवन पाटणकर
शिराळा : "कृषि विभाग आपल्या दारी" या उपक्रमा अंतर्गत खरीप पुर्व हंगामाच्या पार्श्वभुमीवर तालुका कृषी अधिकारी अमरावती अंतर्गत येणाऱ्या मंडळ कृषी अधिकारी वलगाव परिसरातील मौजे शिराळा येथे शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या घरच्या घरी सोयाबीन बियाण्याची उगवण तपासणी प्रात्यक्षिके घरोघरी जाऊन कृषि साहाय्यक मारोती जाधव यांनी करून दाखवित आहेत.
खरीप हंगाम जसा - जसा जवळ येतो,तस- तसे शेतकरी शेतीला लागणार्या विविध निविष्ठाची जुळवाजुळव करताना दिसतात, त्यांना चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण,आणि मान्यताप्राप्त निविष्ठा बरोबरच तांत्रिक मार्गदर्शन मिळने फार महत्त्वाचे असते.
त्यासाठी कृषि सहाय्यक मारोती जाधव यांनी मंगेश पाटील काळमेघ यांच्या कडील जतन करून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिके करून दाखविले.त्याच बरोबर येत्या हंगामात बियाणे, खतांची बचत होण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांनी पेरणी बिबीएफ,पट्टापेर, पध्दतीनी करावी, माती परीक्षणनानुसार व पिका नुसार संतुलीत खतांचा वापर,नरेगा अंतर्गत फळबाग लागवड,पि एम किसान निधी, ॲग्रीस्टॅक ,कृषि व कृषि संलग्न योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले, यावेळी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते..
राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता
तपासणीच्या पद्धती :
१) कुंडी पद्धत : कुंडीत माती भरा, आणि ओला करा,बियाणे व्यवस्थीत पसरवा आणि मातीने झाका,उबदार ठिकाणी ठेवा,अंकुरीत बियाणे मोजून उगवन क्षमता तपासा..
२) पेपर पध्दत : कागदाला ओला करुन त्यात बियाणे ठेवा,कागदाची घडी करुन प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा, उबदार ठिकाणी ४-५ दिवस ठेवा,आंकुरीत बियाणे मोजून उगवन क्षमता तपासा.
३) गोणपाट पध्दत: गोणपाट ओला करून,त्यावर ठराविक अंतरावर बियाणे व्यवस्थीत ठेवावे,त्याची गुंडाळी करून उबदार ठिकाणी ४,५ दिवस ठेवा, अंकुरीत बियाणे मोजून उगवन क्षमता तपासा.
गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा..