१४ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

  


धानोरा - निंभा मार्गांवरील घटना


     


मुर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निंभा शेतशिवारात १४ वर्षीय युवतीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३ एप्रिल रोजी सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास समोर आली आहे. रुतुजा अमोल चवरे असे मृतक युवतीचे नाव असून सकाळी शाळेत जात असल्याचे सांगून तिने घर सोडले होते, मात्र काही वेळानंतर शेजारी राहणाऱ्या जयदीप शिंदे यांनी तिच्या वडिलांना फोन करून माहिती दिली की, तिने विहिरीत उडी घेतली आहे. ही बातमी मिळताच तिचे वडील घटनास्थळी पोहचले असता ती पाण्यात बुडून मृत अवस्थेत आढळली. या घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मर्ग क्रमांक १३/२५ अन्वये कलम १९४ बिएनएसएस प्रमाणे नोंद करण्यात आली. तपास अधिकारी अंमलदार प्रमोद नक्लकर यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post