३३ वर्षीय युवकाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या...!


दर्यापूर उड्डाणपुलानजीकची घटना.....



मूर्तिजापूर : दर्यापूर मार्गावरील असलेल्या उड्डाणपुलानजीक धावत्या रेल्वे खाली उडी घेऊन एका ३३ वर्षीय युवकांने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना गुरवारी ३ एप्रिल रोजी दुपारी २. ३० ते ३ वाजताच्या सुमारास घडली.

मृतकाचे नाव अक्षय सुनील देशमुख वय ३३असे आहे.


 शहरातून गेलेल्या मुंबई -नागपूर लोहमार्गा वरील मूर्तिजापूर येथील दर्यापूर उड्डाणपुलानजीक रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२ दरम्यान तालुक्यातील जामठी (बु) येथील सुनील मुगुटराव देशमुख यांच्या मोठ्या मुलाने गाडी क्रमांक १२८३३ डाऊन अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेसच्या समोर गुरवारी ३ एप्रिल रोजी दुपारी २. ३० ते ३ वाजता च्या दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली. अक्षय सुनिलराव देशमुख असे त्याचे नाव असून तो ३o वर्षाचा होता. 

अक्षय च्या वडिलांच्या सांगण्यानुसार नुकतेच त्यास रेल्वे ए. सी कोचं अटेंडंट म्हणून नागपूर येथे कंत्राक्ती पद्धतीने नोकरी करत होता. व त्यास दुपारी २ वाजता नागपूर येथे जाण्यासाठी वडिलांनी स्वतः मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर सोडले व ते जामठी (बु) येथे परतीच्या प्रवासाला जात असतांनाच अचानक अपघात घडल्याचा कॉल आला असल्याचे सुनील देशमुख यांनी बोलतांना सांगितले. 

तर नुकतेच काही वर्षांपूर्वी अक्षय चे लग्न झाले असून त्यास १ महिन्याचा मुलगा आहे. 

 उपस्थित काहींच्या सांगण्यासुसार सुनील देशमुख यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्याय प्रविष्ट असून नुकतेच शासनाने दाताळा येथील त्यांच्या शेतातील उभ्या पिकावर व राहत्या घरावर गजराज (बुल्डोजर) चालवीला होता. याच टेन्शन मध्ये अक्षय याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितल्या जात आहे. अधिक तपास शहर पोलीस करित आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post