जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रेरणेने व सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट झेनिथ चंद्र दोनतुला यांचे आदेशानुसार, तसेच किशोर यादव तहसीलदार माहूर यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांचा कार्यक्रम ह्या विशेष मोहिमेतर्गत आज दिनांक 03.03.2025 रोजी माहूर तालुक्यातील मौजे कोलामखेडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर आरोग्य शिबिराची सुरुवात थोर समाजसुधारक व आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. शिबिराचे प्रास्ताविक डॉ राजकुमार राठोड, नायब तहसीलदार महसूल यांनी केले. ह्या शिबिरामध्ये 156 लोकांची आरोग्य तपासणी आणि 25 व्यक्तींची रक्त तपासणी करण्यात आली.
सदर शिबिरास प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लहाने व भुरके यांनी आपल्या वैद्यकीय तपासणी चमूसह उपस्थित राहून वैद्यकीय तपासण्या व औषधोपचार केले.
सदर शिबिरासाठी राम ठाकरे, शीतल ढाकूलकर, अनिता कुडमते , ज्योती दुर्योधन ग्राम महसूल अधिकारी, लक्ष्मण मेश्राम ग्राम महसूल सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच ह्या शिबिरासाठी सीताराम मडावी सरपंच वाई, उपसरपंच उस्मान खान पठाण, ग्राम पंचायत सदस्य गोविंद पवार, प्रकाश खडसे, अतिश शिंदे ग्राम पंचायत सदस्य यांनी विशेष सहकार्य केले. सदर शिबिरास माहुरचे नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाचे नियोजन केले.
शिबिराच्या जनजागृती साठी वाई चे पोलिस पाटील, आशा मोरे, परिसरातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.