तहसिल कार्यालय माहुर च्या वतीने योगा शिबिराचे आयोजन

 



माहुर:- सततचा ताण सहानुभूतीशील कार्ये वाढवतो आणि रक्तदाब वाढवतो, ज्यामुळे हृदयावर जास्त भार पडतो ज्यामुळे हृदय अपयश येते. तसेच, तणाव संप्रेरक - कोर्टिसोल - च्या उच्च पातळीच्या संपर्कात आलेली व्यक्ती, कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे संसर्ग किंवा आजारांना बळी पडू शकते. सर्वात सामान्य ताणामुळे होणारे विकार म्हणजे उच्च रक्तदाब, हायपर कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग, आयबीएस, पेप्टिक अल्सर, मायग्रेन इ.



योग ही मन-शरीराची एक अशी पद्धत आहे जी नियंत्रित श्वासोच्छवास आणि ध्यान यासह शारीरिक आसनांना एकत्र करते. म्हणूनच, दीर्घकालीन/सतत ताणतणावाचा सामना करण्यासाठी योग हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे!

त्यामुळे  मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ह्या विशेष मोहिमेतर्गत आज शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून तहसील कार्यालय माहूर येथील सभागृहात तालुक्यातील सर्व महसूल अधिकारी, महसूल सहायक, चतुर्थश्रेणी कर्मचारी , मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक , यांना सतत कार्यमग्न राहिल्यामुळे येणा-या ताण तणावाचे नियंत्रण कसे करावे? यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान धारणा शिकविण्यासाठी योग शिबिर आयोजित करण्यात आले. 

सदरचे योग शिबिरात माहूर तालुक्यातील प्रसिद्ध योग शिक्षक रेणुकादास बेहेरे यांनी महसूल कर्मचारी यांना योगासने, प्राणायाम चे प्रात्यक्षिकं सादर करून, त्यांना योगासने व प्राणायामद्वावारे आपण विविध रोग, आजार यांना दूर ठेवून, दैनंदिन तणावाचे कसे सुलभरित्या नियंत्रण करु शकतो याची अत्यंत सहज सोप्या भाषेत सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजकुमार राठोड, नायब तहसीलदार महसूल यांनी केले. सदर शिबिरास नायब तहसीलदार कैलास जेठे यांचेसह मंडळ अधिकारी विद्यासागर पाईकराव, चंदनाकर तसेच सर्व महसूल कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, शिपाई, कोतवाल यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post