आष्टा उमरा हिवळनी पापलवाडी परिसरातील शेतातील गोट्यासह कच्चे घराचे नुकसान
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यात दिनांक 8 रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते तर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आष्टा, उमरा, हिवळनी, पापलवाडी सह इतर खेड्यात प्रचंड वादळीवाऱ्यासह तुरळक गारपीट झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे मुख्य म्हणजे तीळ पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शेतातील बांधलेले कच्चे गोठे आणि कच्च्या घरांचे टिन पत्रे उडून ताटवाच्या बांधलेल्या भिंती पडल्याची माहिती मिळत आहे रात्री जोरदार वादळी वारे सह गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने नागरिक एकमेकांना सावधानीचा इशारा देताना दिसत होते तर शेतशिवारातील गोठ्यात बांधलेली जनावरे आणि जागलीसाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे असा इशारा प्रभारी तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड यांनी दिला आहे.
माहूर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण सह वादळी वारे आणि तुरळक पाऊस पडल्याच्या घटना घडत असून दि. 8 रोजी मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आष्टा, हिवळणी, पापलवाडी, उमरा या गावाशेजारील शेत वाड्यात प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने तीळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतात बांधलेल्या गोठ्यावरील टिन पत्रे आणि उडून गेले तर ताटव्याच्या बांधलेल्या कच्च्या भिंती पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ढगाळ वातावरण आणि गारपीटीची शक्यता असल्याने महसूल प्रशासनाकडून ही सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
वादळी वाऱ्याने गारपीटीत जीवितहानी झाल्याची घटना घडली नसली तरीही ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे रात्रभरात गारपीट होऊन नागरिकासह गोठ्यात बांधलेल्या जनावरांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी सावध राहावे असा इशारा प्रभारी तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी दिला आहे.