दर्शना करिता मंदिरात नागरिकांची उसळली गर्दी ; शहरातून भव्य मोटासायकल रॅलीसह शोभयात्रा
मूर्तिजापूर - शहरासह तालुक्यात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जुनी वस्ती, तिडके नगर, सराफ लाईन स्टेशन विभाग परिसरातील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
मूर्तिजापूर येथे श्रीररामजन्मोत्सव निमित्ताने ह जुनी वस्ती, तिडके नागर,स्टेशन विभागातील सराफ लाईन परिसरातील राम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सकाळी १० वाजता जुनी वस्ती येथील स्वामी समर्थ मंदिर येथून सकल हिंदू समाज व श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती च्या वतीने शहरातून भव्य मोटर सायकल रॅली तर सायंकाळी
संपूर्ण शहरातून विविध जिवंत देखाव्यांसह भव्य शोभयात्रा काढण्यात आली. या शोभयात्रेचे महिलांनी वाटेत ठिक -ठिकाणी औक्षण करून फुलांची उधळण करून स्वागत केले.तर लकडगंज परिसरातील दुर्गा माता मंदिर येथे छावा संघटनेचे संजय गुप्ता यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले.
सायंकाळी उशिरा पर्यंत मिरवणूक चालली मिरवणूक शांततेत पार पडावी या करिता शहर पोलीस स्टेशनच्या वतीने ठिक ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तर श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी राम जन्मोत्सव शोभायात्रेच्या मार्गाचे निरीक्षण करून अकोला येथून आर.सी.पी पथकाचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.