जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील कैद्यांना वाचनासाठी पुस्तके भेट

 


कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)!वाचाल तर वाचाल!मोबाईल,पीडीएफ,इलेक्ट्रॉनिक मिडीया,काॅम्पीटरच्या या युगात वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे.वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे,तो गुन्हेगार असला तरी शिक्षा भोगण्यासाठी कारागृह येतो.कारागृहातील अशा कैद्यांचा वेळ जात नाही.कारागृहातील कैद्यांचा वेळ सत्कारणी लागावा म्हणून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील कैद्यांसाठी पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.सर्व प्रथम जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करुन दिली.त्यानंतर कल्याण आधारवाडी कारागृहाचे उप अधिक्षक यु.पी.पाटील,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजीत कोळी यांजकडे संस्थेच्या वतीने दिवाळी अंक,प्रवास वर्णन,ललित लेख संग्रह,काव्यसंग्रह,कथा संग्रह अशा विविध प्रकारची पुस्तके सुपूर्द करण्यात आली.याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक अरविंद सुर्वे,महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या कार्याध्यक्षा श्रुती उरणकर,मुंबई अॅन्टीपायरसी सेल चे मुख्य तपाशी अधिकारी रामजित गुप्ता,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण समितीचे माजी सभापती तसेच बिर्ला काॅलेजचे माजी उप प्राचार्य प्रा.उदय सामंत सेवा सेवा समाधान ट्रस्ट च्या विश्वस्त मानसी मोने,शब्दसुमने साहित्य मंच च्या अध्यक्षा अनिता कळसकर,बहिणाबाई ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुनिल इंगळे,बदलापूर येथील उत्कर्ष सेवा मंडळाचे सचिव विलास शिंदे,सेवा निवृत्त बॅंक अधिकारी रविंद्र कुलकर्णी,समाजसेविका गायत्री पांडे आधारवाडी कारागृहातील वैद्यकिय अधिकारी डाॅ.मंगेश जाधव,कारागृह लिपिक शुभम भांगे, महिला पोलिस आदी मान्यवर उपस्थित होते.कारागृह उप अधिक्षक यु.पी.पाटील यांनी कारागृहातील वास्तव,दिनक्रम,कार्यशैली या संदर्भात सविस्तर माहिती दिली.तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजीत कोळी यांनीही पहिल्यापासूनच संस्थेला योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन केले.उपस्थित मान्यवरांच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी शिक्षण समिती सभापती तसेच बिर्ला काॅलेजचे माजी उप प्राचार्य प्रा.उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.विशेष म्हणजे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तिचे व्याख्याते,समुपदेशक,लेखक डाॅ.महेश अभ्यंकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.शेवटी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post